वडाळ्यामध्ये इमारतीवरून उडी मारून मुलाची आत्महत्या – eNavakal
News महाराष्ट्र

वडाळ्यामध्ये इमारतीवरून उडी मारून मुलाची आत्महत्या

मुंबई – वडाळा येथे रियान प्रबल चक्रवर्ती नावाच्या एका 13 वर्षांच्या शाळकरी मुलाने आत्महत्या केली. त्याने त्याच्या इमारतीच्या अठराव्या मजल्यावरील टेरेसवरुन उडी घेतली होती, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सांगळे
यांनी सांगितले.
याप्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी एडीआरची नोंद केली असून त्याच्या आई-वडिलांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे सांगितले. ही घटना गुरुवारी पावणेचार वाजता वडाळा येथील आयमॅक्स सिनेमागृहाजवळील गिरनार हाईट्स इमारतीमध्ये घडली. रियान हा सांताक्रुज येथील एका खाजगी शाळेत आठवीत शिकत होता. त्याचे वडिल शेअरमार्केटमध्ये तर आई एका खाजगी बँकेत कामाला आहे.
गुरुवारी दुपारी त्याचे आई-वडिल नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले होते तर रियान हा शाळेत गेला होता. दुपारी तो शाळेतून घरी आला. त्यानंतर पावणेचार वाजता रियान हा घरातून इमारतीच्या अठराव्या मजल्यावरील टेरेसवर गेला होता. तेथून त्याने उडी घेऊन आत्महत्या केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मोनो रेलची वाहतूक पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई – मोनो रेलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडली. मोनो रेलला होणारा विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याने चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियमदरम्यान मोनोरेल बंद...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा

औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी कॉंग्रेसच्या प्रसारमध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा...
Read More