वडाळ्यातील वनजमिनीवरील झोपडवासीयांना दिलासा नाही – eNavakal
News न्यायालय

वडाळ्यातील वनजमिनीवरील झोपडवासीयांना दिलासा नाही

मुंबई- वडाळ्याच्या वनजमिनीवर उभारण्यात आलेली बेकायदा बांधकामे अधिकृत करा अशी विनंती करून उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या सुमारे 60 रहिवाश्यांना उच्च न्यायालयाने आज दिलासा देण्यास नकार दिला. कांदळवनांच्या जागेवर उभारण्यात आलेल्या या बेकायदा झोपड्या अधिकृत करता येणार नाहीत असे स्पष्ट करून न्यायमूर्ती आर.एम.बोर्डे आणि न्यायमूर्ती वी.एल.अचलिया यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या आदेशामुळे सुमारे 300 झोपड्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
वडाळा येथील सर्व्हे नं. 83 येथील कांदळवनांची कत्तल करुन भूमाफियांनी वनजमिनीवर 300 हून अधिक झोपड्या उभारल्या आहेत. याप्रकरणी वनविभागाने रहिवशांना या झोपड्या हटविण्याबाबत नोटीस पाठविल्या आहेत. वनविभागाने यावर सुनावणी घेऊन या परीसरातील झोपड्या बेकायदा ठरविल्या. वनविभागाच्या या निर्णयाविरोधात वीर जिजामाता सेवा संघाच्या वतीने सुमारे 60 रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. राज्य सरकारला या झोपड्या अधिकृत करुन देण्याचा आदेश द्यावा अथवा आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी याचिकाकर्त्यांनी याचिकेत केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती वी.एल.अचलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सरकारच्या वतीने अ‍ॅड. सुकांत करमकर यांनी जोरदार विरोध केला. ही जागा वनखात्याची असून त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या या झोपड्या बेकायदा आहेत. तसचे राज्य सरकारने शासनाने केलेल्या सॅटेलाईट सर्व्हेे मध्येही ही घरे कांदळवनांच्या जागेवर उभारण्यात आल्याचे अ‍ॅड.करमकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल घेऊन न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More