वडाळ्याच्या राजाचा रौप्यमहोत्सव – eNavakal
मुंबई

वडाळ्याच्या राजाचा रौप्यमहोत्सव

मुंबई – वडाळा रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस असलेले वडाळ्याचा राजा श्री गणेश उत्सव मंडळ यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. गेल्या 25 वर्षांत वडाळ्याचा राजाने सामाजिक बांधिलकीचा वसा जपला आहे. यावर्षीदेखील गणेशोत्सवानिमित्त मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

मंडळाने वडाळा परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढावी याकरिता 200 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे अनावरण गणेशोत्सवादरम्यान होत आहे. त्यानिमित्ताने सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्पाची माहिती असणार्‍या शॉर्ट फिल्मचेदेखील प्रकाशन होणार आहे. समाजाच्या हितापोटी झटणार्‍या विविध क्षेत्रातील 25 मान्यवरांचा सत्कार हे यंदाच्या उत्सवाचे खास आकर्षण आहे. त्याचबरोबर मातेचे जागरण, आर्मी, नेव्ही, केरळ पूरग्रस्तांसाठी मदत निधीची व्यवस्था, नागरिकांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यावर्षी सत्यनारायणाची महापूजा आणि सुमारे 5000 लोकांसाठी महाप्रसाद भंडारा आयोजित केला जाणार आहे.

वडाळ्याचा राजा आणि सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने 15 सप्टेंबर रोजी महिलांसाठी सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे मंडळाचे सचिव जयंत पटेल यांनी कळविले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे मशीन कोमात

वसई- वसई-विरार महापालिकेच्या नालासोपार्‍यातील रुग्णालयाची एक्स-रे मशीन महिनाभरापासून नादुरुस्त असून आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब रुग्णांना हजारो रुपयांचा भुर्दंड हकनाक सोसावा लागत आहे. नालासोपारा पुर्वेकडील...
Read More
post-image
News विदेश

‘जैश’चे मुख्यालय पाकिस्तानने घेतले ताब्यात

इस्लामाबाद – भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय ताब्यात घेतले आहे. मौलाना मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय बहावलपूरमध्ये आहे. पंजाब सरकारने हे मुख्यालय ताब्यात घेतल्याची...
Read More
post-image
News महाराष्ट्र

प्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालयात

महाड- शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांना रक्तदाब कमी झाल्याचा त्रास झाल्याने महाड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळच्या सुमारास...
Read More