वटपौर्णिमेच्या दिवशी ‘महिला’ सोनसाखळी चोरांच्या निशाण्यावर – eNavakal
News गुन्हे

वटपौर्णिमेच्या दिवशी ‘महिला’ सोनसाखळी चोरांच्या निशाण्यावर

पुणे – वटपौर्णिमेच्या दिवशी वड वृक्षाला पूजण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलांना सोनसाखळी चोरांनी टार्गेट केलं आहे. तब्बल १३ सोनसाखळी चोरीच्या घटना बुधवारी दुपारपर्यंत घडल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेल्याने महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना अधून-मधून सुरूच आहेत. काही सोनसाखळी चोरांना पोलिसांकडून पकडण्यात यश आले आहे. पण, पूर्ण शहरातील या घटना रोखण्यात यश आलेले नाही. बुधवारी वटपौर्णिमेनिमित्त पूजेसाठी अनेक महिला सोन्याचे दागिने अंगावर घालून बाहेर पडल्या होत्या. सोनसाखळी चोरट्यांन याच संधीचा फायदा घेतला.  शहरातील सांगवी पोलीस ठाण्यात सर्वाधिक चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा मिनिटाच्या अंतराने दोन घटना घडल्या आहेत. तसेच, वाकड, शिवाजीनगर, लष्कर, डेक्कन, कोंढवा आणि भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

शहरात दुपारपर्यंत आठ घटनांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. या घटनांनंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे निरीक्षक व तपास पथकाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर गस्त घालण्यास सांगितले असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

देशभरात 4,281 कोरोनाग्रस्त! राज्यात ८६८ रुग्ण

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: साडेपाच लाख बेघर मजुरांना अन्नवाटप- मुख्यमंत्री

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये एकूण ४६५३ मदत केंद्रे स्थापन केली आहेत. यामध्ये ४,५४,१४२ स्थलांतरित मजूर आणि कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: राज्यात कोरोनाचे ८६८ रुग्ण, मुंबई डेंजर झोनमध्येच!

मुंबई – देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. गेल्या २४ तासांत १२० नवे रुग्ण सापडले असून आता कोरोनाबाधितांची...
Read More
post-image
देश

जात, धर्म विसरून साऱ्यांनी एकत्र येऊया- राहुल गांधी

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर सगळ्या देशाने धर्म, जात, संप्रदाय, गरीब-श्रीमंत हा सगळा भेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे असं...
Read More
post-image
महाराष्ट्र

आपत्कालीन परिस्थीतीसाठी केंद्राकडे मागितले पीपीई किट्स आणि मास्क- टोपे

मुंबई – कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामग्री उपलब्ध आहे. मात्र, आपत्कालीन स्थिती ओढवल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई...
Read More