वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मिळणार आर टी ई अंतर्गत आॅनलाईन प्रवेश – eNavakal
अन्य मुंबई शिक्षण

वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मिळणार आर टी ई अंतर्गत आॅनलाईन प्रवेश

कल्याण – वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्या बरोबर दर्जेदार खाजगी शाळेत प्रवेश देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत .ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून कल्याण ग्रामीण भागातील सुमारे 46 शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांनाही आता  खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळा मध्ये प्रवेश मिळणार असल्याने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेला वाव मिळणार असल्याचे दिसून येत आहे .
 कल्याण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 125 शाळा आहेत. 101 गाव खेड्यातील गोरगरिबांसाठी या शाळा विद्येचे माहेरघर बनल्या आहेत. परंतु आज प्रत्येक गावात इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे आक्रमण झाले आहे. पालकांच्या बदलेल्या रुची मुळे या शाळांनकडे त्यांचा कल वाढतो आहे. भरमसाठ फी व डोनेशन यामुळे इंग्रजी शिक्षण ही श्रीमंताची मिरासदारी बनली आहे. यावर अंकुश लावण्यासाठी शिक्षण विभागाने 25% प्रवेश निश्चित केला. यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा हक्क अधिकार कायद्यानुसार समाजातील गरीब व गरजू तसेच दुर्बल घटकांना त्यांच्या मुलांना खाजगी शाळेत प्रवेश मिळावा म्हणून आर टी ई आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कल्याण ग्रामीण भागातील 46 शाळांची नोंदणी /रजिस्ट्रेशन केले आहे. 1162 रिक्त जागा असून पालकांच्या मदतीसाठी होली क्रॅास इंग्लिश स्कूल, जी आर पाटिल विद्यामंदिर, मारथोमा विद्यापीठ, आर पी एस इंग्लिश स्कूल पिसवली या शाळेत मदतकें उभारण्यात आली आहेत.
या साठी पालकांना 10/2/2018ते 28/2/2018 या कालावधीत आर टी ई अंतर्गत 25%प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी या प्रक्रियेत सगळ्या प्रमाणे घटस्फोटित, महिला विधवा, अनाथ आणि दिव्याग यांच्या बालकांना ही प्रवेश दिला जाणार आहे. या संदर्भात अथवा आॅनलाईन अर्ज भरताना काही अडचण निर्माण झाल्यास 022/33494333 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा यावर त्या पालकांना तात्काळ मार्गदर्शन मिळेल असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.आॅनलाईन प्रवेश अर्ज भरताना आधारकार्ड, लाईट बील, निवडणूक ओळखपत्र, टेलिफोन बील, वाहन चालविण्याचा परवाना, यापैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. शिवाय एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला जन्माचा दाखला, आणि रंगीत फोटो द्यावे लागणार आहे. त्यामुळे गोरगरिब विद्यार्थीकरीता खाजगी शाळेत शिक्षण घेणे सोपे जाईल व या 25%आर, टी, ई आॅनलाईन प्रवेशाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी  ललिता दहीतुले यांनी केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कुकडी नदीवरील बंधारा पाण्याअभावी कोरडाच

कवठे येमाई – शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथील कुकडी नदीवरील बंधारा अखेर पाण्याअभावी कोरडाच राहिला असून पाणी न आल्यास या प्रश्नी तीव्र आंदोलन करण्याचा कडक...
Read More
post-image
News देश निवडणूक

बिहारमध्ये महाआघाडीचे जागावाटप जाहीर

पाटणा – लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये आज महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाली. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महाआघाडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More