नवी दिल्ली – विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे चिन्ह वाटप सुरू केले आहे. निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह दिले आहे. तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन हे चिन्ह मिळाले आहे. तसेच महाराष्ट्र क्रांती सेनेला हिरा हे चिन्ह देण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांची निवडणूक चिन्हे यापूर्वीचीच असणार आहेत. जसे की, भाजपाचं कमळ, कॉंग्रेसचा पंजा, शिवसेनेचं धनुष्यबाण, राष्ट्रवादीचं घड्याळ आणि मनसेचं रेल्वे इंजिन अशी चिन्हे असतील.
कोणते चिन्ह कोणत्या पक्षाला?
वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर
संभाजी ब्रिगेड – शिलाई मशीन
महाराष्ट्र क्रांती सेना – हिरा
हम भारतीय पार्टी – ऊस घेतलेला शेतकरी
टिपू सुलतान पार्टी – किटली
भारतीय जनसम्राट पार्टी – टेलिफोन