वंचित आघाडीचे 37 उमेदवार जाहीर; अकोला गुलदस्त्यात – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीचे 37 उमेदवार जाहीर; अकोला गुलदस्त्यात

मुंबई – अखेर वंचित बहुजन आघाडीने आज 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. आघाडीकडून अकोला लोकसभा मतदारसंघासह आठ जागा अद्यापही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे अकोला की सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. 37 जणांच्या यादीत राज्यात लोकसंख्या 10 टक्के असलेल्या बौद्धांच्या वाट्याला केवळ चार जागा आलेल्या आहेत.

वंचित आघाडीच्या यादीत दोन मुस्लीम, एक मातंग, धनगर, कोळी, वडार, कुणबी, वारली, आगरा आदी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे वंचित आघाडीच्या 37 मतदारसंघांच्या घोषित यादीत उमेदवारांच्या जातींचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.

यादी पुढीलप्रमाणे –
पहिला टप्पा – वर्धा- धनराज वंजारी (वंजारी समाज), रामटेक – किरण रोडगे-पाटनकर (बौद्ध), भंडारा-गोंदिया – एन.के. नान्हे (धिवर समाज), गडचिरोली-चिमूर – डॉ. रमेश गजबे (माना आदिवासी), चंद्रपूर – एड. राजेंद्र महाडोळे (माळी), यवतमाळ-वाशीम – प्रो. प्रवीण पवार (बंजारा).
दुसरा टप्पा – बुलढाणा – बळीराम सिरस्कार (माळी), अमरावती – गुणवंत देवपारे (बौद्ध), हिंगोली – मोहन राठोड (बंजारा), नांदेड – प्रा. यशपाल भिंगे (धनगर), परभणी – आलमगीर खान अखिल मोहम्मद खान (मुस्लीम), बीड – प्रा. विष्णू जाधव (कैकाडी), उस्मानाबाद – अर्जून सलगर (धनगर), लातूर – राम गारकर (मातंग).
तिसरा टप्पा – जळगाव – सौ. अंजली रत्नाकर बावीस्कर (शिंपी), रावेर – नितीन कांडेलकर (कोळी), जालना – डॉ. शरदचंद्र वानखेडे (विश्‍वकर्मा), रायगड – सुमन कोळी (कोळी), पुणे- अनिल जाधव – (वडार), बारामती – नवनाथ पडळकर (धनगर), माढा – एड. विजय मोरे (धनगर), सांगली – जयसिंग (तात्या) शेंडगे (धनगर), सातारा- सहदेव एवळे (होलार), रत्नागिरी-सिंधुदुर्ग – मारुती रामचंद्र जोशी (काका) (कुणबी), कोल्हापूर – डॉ. अरुणा माळी (लिंगायत), हातकंणगले – अस्लम बादशाहजी सय्यद (मुस्लीम).
चौथा टप्पा – नंदुरबार – दाजमल गजमल मोरे (भिल्ल), दिंडोरी – बापू केळू बर्डे (भिल्ल), नाशिक – पवन पवार (बौद्ध), पालघर – सुरेश अर्जुन पडवी (वारली), भिवंडी – डॉ.ए.डी. सावंत (कुणबी), ठाणे – मल्लिकार्जुन पुजारी (धनगर), मुंबई साऊथ दक्षिण – डॉ. अनिल कुमार, मुंबई साऊथ सेंट्रल (दक्षिण मध्य) – डॉ. संजय भोसले, इशान्य मुंबई – संभाजी शिवाजी काशीद (मराठा), मावळ – राजाराम पाटील (आगरी), शिर्डी – डॉ. अरुण साबळे (बौद्ध).

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

ट्रेकिंग करणार्‍या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नाशिक – नाशिकच्या प्रसिद्ध पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करणार्‍या एक तरुणावर काल सकाळी बिबट्याने हल्ल्यात केला. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला परंतु बिबट्या हाती...
Read More
post-image
News देश

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट वादाच्या भोवर्‍यात! चित्रपटासाठी गीत लिहिले नाही! जावेद अख्तर

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने या चित्रपटात नरेंद्र...
Read More