‘वंचित’मुळे आंबेडकरी समाजात नैराश्य – आनंदराज आंबेडकर – eNavakal
आघाडीच्या बातम्या

‘वंचित’मुळे आंबेडकरी समाजात नैराश्य – आनंदराज आंबेडकर

औरंगाबाद – वंचित बहुजन आघाडीमुळे आंबेडकरी समाजात नैराश्य आले आहे, असा आरोप रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. तसेच आंबेडकरी जनतेला नवा पर्याय देणार असल्याचेही ते म्हणाले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आनंदराज आंबेडकर येथे आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केले.

वंचित बहुजन आघाडीला आम्ही पाठिंबा दिला होता. पंरतु वंचितला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आंबेडकरी जनतेत नैराश्य आले, असे आनंदराज म्हणाले. तसेच वंचित आघाडीसोबत आलेले ओबीसी नेते हे ओबीसी समाजचे नेते होते का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवाय वंचित आघाडी समाजापर्यंत पोहोचली का? वंचितसोबत जोडल्या गेलेल्या इतर घटकांचे मतदान वंचितला मिळाले का?, असे प्रश्न त्यांनी येथे उपस्थित केले. दरम्यान, रिपब्लिकन सेनेच्यावतीने आंबेडकरी जनतेला एकत्र करून सत्तेपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही पक्षाची नव्याने बांधणी करत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

रिब्लिकन सेना औरंगाबादमधून मनपा निवडणूक लढवणार 

रिपब्लिकन सेना औरंगाबादमधून मनपा निवडणूक लढणार असल्याची घोषणा आनंदराज आंबेडकर यांनी केली. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

अमित शहा यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार न करता खासगी रुग्णालयात का? काँग्रेसचा सवाल

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना कोरोनाची लागण झाल्यानंतर तुलना उत्तर प्रदेशमधील गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र त्यावर आता काँग्रेसचे...
Read More
post-image
गुन्हे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई राजकीय

‘मुंबई पोलिसांची सुरक्षा घेऊन त्यांच्यावरच नीच आरोप?’ शिवसेनेकडून अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी आता राजकारणही चांगलंच तापत आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनसे नेते अविनाश जाधव यांचा जामिन अर्ज फेटाळला

ठाणे – परिचारिकांसाठी वसई महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन केल्याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्याने त्यांना...
Read More
post-image
महाराष्ट्र

शिवसेनेला हिंदूत्व व सामाजिक बांधिलकीचा विसर, दरेकरांचा हल्लाबोल

खेड – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदूत्वाचा जाज्वल्य विचार केला होता. शिवसेनेने हिंदूत्वावर अनेक निवडणूकाही लढविल्या. पण सध्या सत्तेसाठी शिवसेनेला हिंदूत्वाचा विसर पडलेला...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

संजय राऊतांचा भाजपासाठी फिल्मी डायलॉग, म्हणाले…

मुंबई –  ‘जिनके घर शीशेके बने होते है..वो दुसरो पे पत्थर नही फेका करते… समझनेवालों को इशारा काफी है,’ अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर...
Read More