‘लोकांचे दोस्त’तर्फे स्वातंत्र्यदिनी ‘तिरंगा उठाव, भाजप हटाव’ रॅली – eNavakal
देश

‘लोकांचे दोस्त’तर्फे स्वातंत्र्यदिनी ‘तिरंगा उठाव, भाजप हटाव’ रॅली

मुंबई – ‘लोकांचे दोस्त’ आणि समविचारी लोकशाहीवादी, परिवर्तनवादी सामाजिक, राजकीय संस्था संघटनांच्या वतीने 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात ‘तिरंगा उठाव, भाजप हटाव’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत गुजरातमधील लढाऊ आमदार जिग्नेश मेवानी यांच्यासह विविध संस्था संघटनांचे प्रमुख नेते, कार्यकर्ते, पत्रकार, साहित्यिक, कलावंत आणि उपेक्षित वंचित समूहातील भारतीय जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी लोकांचे दोस्त रंजना आठवले, सुनंदा नेवसे, संजीवनी नांगरे, दैवशाला गिरी, बाळासाहेब उमप, समीर अंतुले यांनी रॅलीची सविस्तर माहिती दिली. 15 ऑगस्ट रोजी दादर पश्चिम येथील वीर कोतवाल उद्यानातून दुपारी 2 वाजता ही रॅली सुरू होईल. त्यानंतर शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून रॅली संपन्न होईल. यावेळी महिला नेत्यांनी कटुआ आणि उनाव येथील बलात्काराच्या संघटनांचा संदर्भ देताना सांगितले की, बलात्कार करणार्‍या भाजपा नेत्यांवर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जाते, त्यांना वाचवण्यासाठी तिरंगा हातात घेऊन मोर्चे काढले जातात. हा तिरंगा आणि देशाचा अपमान आहे.

आज देशभरातील स्त्रिया भयभीत आहेत. अशा या बलात्कारी सत्तेविरोधात तिरंगा हातात घेऊनच आम्ही मैदानात उतरलो आहोत. तसेच प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी, पोलिसी बळावर लोकांच्या आंदोलनाचा आवाज दाबण्याचा भाजपाचा प्रयत्न याविरोधात ही रॅली असून भारतीय जनतेने मोठ्या संख्येने या रॅलीत सामील व्हावे असे आवाहन लोकांचे दोस्तचे अध्यक्ष रवी भिलाणे, रॅलीचे संयोजक फिरोज मिठीबोरवाला, विनायक साळुंखे, भानुदास धुरी, काशिनाथ निकाळजे, बाळासाहेब उपम, समीर अंतुले आदींनी केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

अरुणाचल प्रदेशात 6 नागा बंडखोरांचा खात्मा

इटानगर – अरुणाचल प्रदेशाच्या लोंडिंग जिल्ह्यातील निगीनू गावात आसाम रायफल्स- अरुणाचल प्रदेश पोलीसचे संयुक्त पथक आणि एनएससीएन संघटनेच्या नागा बंडखोरांमध्ये झालेल्या चकमकीत सहा बंडखोर ठार...
Read More
post-image
Uncategoriz देश

कर्नाटक मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना

बेळगाव- मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांचे गृह कार्यालय कृष्णा येथील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची (Corona Infected) लागण झाली आहे. टेलिफोन ऑपरेटर, दोन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात पकडलं, महाराष्ट्र एटीएसची कामगिरी

मुंबई – उत्तर प्रदेशातील आठ पोलीस हत्याकांडातील दोन आरोपींना ठाण्यातील कोलशेत येथून अटक करण्यात आली आहे. हे दोघेही विकास दुबेचे साथीदार होते. दरम्यान, या हत्याकांडातील...
Read More
post-image
मनोरंजन

बिहारमधील ‘या’ रस्त्याला सुशांत सिंह राजपुतचे नाव

पाटणा – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Sing Rajput Suicide Case) निधनाचा देशभरातील चाहत्यांना धक्का बसला आहे. लोक आपआपल्यापरिने त्याला श्रद्धांजली देत आहेत. नुकतेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

घरगुती गणेशोत्सवावरही मर्यादा! राज्य सरकारने जारी केली मार्गदर्शक सूचना

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार अनेक गणेशमंडळांनी गणेशमूर्ती न बसवता आरोग्य उत्सव साजरा करण्याचे...
Read More