लोकसभेसाठी नांदेडच्या कोट्यधीशांमध्ये चुरस – eNavakal
निवडणूक महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

लोकसभेसाठी नांदेडच्या कोट्यधीशांमध्ये चुरस

नांदेड – नांदेड लोकसभेसाठी दोन प्रमुख कोट्यधीश उमेदवारांमध्ये लढत होणार असून तिसरा उमेदवारही लखपती असल्याचे निवडणूक अर्ज सादर करताना दिलेल्या विवरणपत्रातून स्पष्ट झाले आहे.

आजच्या घडीला अशोकराव चव्हाण यांच्याकडे ४ लाख ८३ हजार ४६५ रुपये रोख आहेत. त्यांच्या सौभाग्यवती अमिता चव्हाण यांच्याकडे १ लाख ९१ हजार २०० रुपये रोख स्वरुपात उपलब्ध आहेत. चव्हाण यांच्या विविध बँक खाते, ठेवी, शेअर्स, बचत रक्कम आदींचा आकडा हा २ कोटी ५८ लाख ६३ हजार ७९० रुपये किमतीचा आहे. त्यात सोने, चांदी, हिऱ्यांचाही समावेश आहे. सोन्या-चांदीची किंमत २२ लाख ७९ हजार २६१ तर हिऱ्यांची किंमत २६ लाख ६० हजार ७९ रुपये इतकी आहे. जमीन, शेती आदी मालमत्ताही चव्हाण यांच्याकडे उपलब्ध असून याची किंमत २० कोटी ६६ लाख ३९ हजार २४० रुपये दर्शविण्यात आली आहे. त्याचवेळी अशोकराव चव्हाण यांच्यावर २ कोटी ८१ लाख ९२ हजार रुपयांचे कर्जही असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे कोट्यधीश आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८ कोटी ५३ लाख ६३ हजार ८२५ रुपये इतक्या किमतीची आहे. त्यात प्रतापराव यांच्याकडे रोख २२ लाख ४३ हजार ५८६ रूपये आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाबाई चिखलीकर यांच्याकडे २ लाख ३० हजार रुपयांची रोकड आहे. चिखलीकरांकडे ११ तोळे सोने असून त्याची किंमत ३ लाख ५२ हजार रुपये आहे. तर १५ लाख ६ हजार ६२ रुपयांच्या विविध ठेवीही आहेत. १६ हजार ८३५ रुपयांची गुंतवणूकही त्यांनी शेअर्स आदी माध्यमांतून केली आहे. विमा, बचत खाते आदींच्या माध्यमातून ३० लाख ७० हजार ९५२ रुपये त्यांनी गुंतवले आहेत. जवळपास ७२ लाख ५९ हजार रुपये किमतीची त्यांची एकूण संपत्ती आहे. चिखलीकरांकडे शेतजमीन तसेच वारसाप्रमाणे मालमत्ता उपलब्ध आहे. या मालमत्ताची किंमत ३० लाख रुपये दर्शविण्यात आली आहे. जमीन, निवासी इमारती आदी १ कोटी ३५ लाखांची मालमत्ताही चिखलीकर यांच्याकडे उपलब्ध आहे. चिखलीकर यांच्यावर ५ लाख ९४ हजार रुपयांचे कर्ज आहे.

नांदेड लोकसभा निवडणुकीतील तिसरे प्रमुख उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे हे लखपती असून त्यांच्याकडे ६९ लाख ८१ हजार रुपयांची एकूण संपत्ती आहे. भिंगे यांच्याकडे ३ लाख रुपये रोख आहेत. तर बँक खात्यात ३ लाख ५३ हजार ३५९ रुपये उपलब्ध आहेत. वाहनांची किंमत ११ लाख ७४ हजार ६७६ रुपये इतकी आहे. त्यांच्याकडे दोन तोळे सोने उपलब्ध असून ६० हजार रुपये किंमत दर्शविण्यात आली आहे. भिंगे यांच्या इतर मालमत्तांमध्ये निवासी इमारतीची किंमत ५० लाख २० हजार रुपये इतकी आहे. भिंगे यांच्यावर २० लाख ५० हजार रुपयांचे कर्जही आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More