लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू! पर्ससीननेट मच्छिमारांचा इशारा – eNavakal
News महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू! पर्ससीननेट मच्छिमारांचा इशारा

रत्नागिरी – शासनकर्त्यांनी सोमवंशी अहवालाची बंधने लादून मच्छिमारांचा गळा दाबण्याचे कारस्थान केले आहे. त्या जाचक बंधनांचा तातडीने पूर्नविचार करून ती मागे घ्यावीत. अन्यथा मच्छिमारांवर शासन, प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईच्या विरोधात पुढचे पाऊल म्हणून येत्या लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार घालण्याचा गंर्भित इशारा पर्ससीननेट मच्छिमार तालुका व जिल्हा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
पर्ससिन नेट मच्छिमारांवर नियमानुसार मच्छिमारी करूनही केल्या जाणाऱया कारवाईला तालुका व जिल्हा पर्ससिननेट मच्छिमार संघटनेने प्रशासनाच्या कारवाईविरोधात सडेतोड भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शनिवारी 23 मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व पर्ससिननेट मच्छिमारांची रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीवर बैठक पार पडली. या बैठकीला संघटनेचे जावेद होडेकर, विकास सावंत, नासीर वाघू, सुलेमान मुल्ला, विजय खेडेकर, इम्रान मुकादम, नाटे येथील आदम मुकादम आदी मच्छिमार पदाधिकाऱयांची प्रमुख उपस्थिती होती. पर्ससिननेट मच्छिमार आज नियमानुसार 12 नॉटीकल मैल बाहेरी खोल समुद्रात जावून मासेमारी करत आहेत. तरीसुध्दा प्रशासन या पर्ससीन नेट नौकांवर कारवाई केली जात असल्याचा आक्षेप पर्ससिननेट मच्छिमार संघटनांकडून घेण्यात येत आहे. राज्य मासेमारी अधिनियम 1981 नुसार ट्रॉलींग मासेमारीसाठीही नियम आहे. ट्रॉलिंग पध्दतीने मासेमारी करणाऱया नौकांवर या नियमानुसार शासनाने बंधने घातलेली आहेत. मात्र या अनधिकृत मासेमारी करणाऱया बोटींवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आक्षेप सुलेमान मुल्ला यांनी व्यक्त केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More