लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेणार – eNavakal
News आघाडीच्या बातम्या देश महत्वाच्या बातम्या

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेणार

नवी दिल्ली – लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून विधी आयोग त्यासाठी जोमाने कामाला लागला आहे. एकत्रित निवडणुकांची योजना ही 2019 आणि 2024 अशा टप्प्यांत असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ ही संकल्पना साकारण्यासाठी हा एकत्र निवडणुकांचा घाट रचला आहे, मात्र यासाठी काही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ वाढवावा लागणार आहे, तर काहीचा कार्यकाळ कमी करावा लागणार आहे. यासाठी राज्यघटनेत आणि रिप्रेझेन्टेशन ऑफ पीपल अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे. तसा प्रस्ताव या आराखड्यात आहे.

या पार्श्वभूमीवर विधी आयोगाने एकत्रित निवडणुकांवर सर्वच राजकीय पक्षांची मते जाणून घेण्यासाठी दोन दिवसांची बैठक आयोजित केली होती. विधी आयोगाने यासंदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी सर्वच राजकीय आणि प्रादेशिक पक्षांना 14 जून रोजीच पत्रे पाठविली आहेत.
एकत्रित निवडणुका घेण्यास द्रमुक आणि आम आदमी पार्टीने मात्र विरोध केला आहे. हा प्रकार देशाच्या संविधानाच्या मूलभूत सिद्धांताच्या विरोधात आहे, असे द्रमुकच्या नेत्यांनी म्हटले आहे, तर आम आदमी पार्टीचे आशिष खेतान यांनी म्हटले आहे की, एकत्रित निवडणुकांमुळे लोकशाहीचा आणि संघराज्य पद्धतीचा विनाश ओढवेल. सपा, जेडीयू आणि तेलंगणा राष्ट्र समितीने मात्र या प्रस्तावास पाठिंबा दिला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

#Bond25 लशाना साकारणार ‘AGENT 007’

किंग्स्टन – जगप्रसिद्ध बॉन्ड सिरीजचा २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘सीक्रेट एजंट ००७’ ही अतिशय गाजलेली भूमिका यावेळी कोणी अभिनेता नाही तर एक...
Read More
post-image
देश मुंबई

कर्नाटकच्या बंडखोर आमदारावर मुंबईत उपचार

मुंबई – कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेस सुरुवात झाली आहे. मात्र बंडखोर आमदार यावेळी उपस्थित नसल्याने कुमारस्वामी सरकारवरील संकट कायम आहे. त्यातच मुंबईत असलेले कॉंग्रेसचे बंडखोर...
Read More
post-image
महाराष्ट्र

आंबेनळी घाट बस दुर्घटनेचा तपास थांबण्याची पोलिसांची मागणी

रत्नागिरी – पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात बस कोसळली होती. या दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. त्यामुळे रायगड पोलिसांनी न्यायालयात याप्रकरणाचा तपास थांबविण्याची परवानगी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार

मुंबई – जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या आठवडाभरापासून कोकण वगळता इतर भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु आजपासून राज्यात पाऊस...
Read More
post-image
मनोरंजन

‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का?

मुंबई – आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलिनिअर फेम देव पटेल याच्यासह ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला...
Read More