‘लोकनाट्याचा ‘राजा’ हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे निधन – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘लोकनाट्याचा ‘राजा’ हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे निधन

मुंबई – गेली ६० वर्षे अभिनय क्षेत्र गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे आज वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राजा मयेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगी आणि नातवंडं, असा परिवार आहे.

नाटक, चित्रपट, छोट्या पडद्यावरील मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांत त्यांनी काम केलं. वयाच्या १५ व्या वर्षापासून त्यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. तसेच दशावतारी नाटकापासून त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला होता. त्यांची आंधळं दळतंय’, ‘यमराज्यात एक रात्र’, असुनी खास घराचा मालक’, ही तीन लोकनाट्ये तुफान गाजली. रंगभूमीच्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना ‘लोकनाट्याचा राजा’ असा किताब देण्यात आला होता.

Sharing is caring!

1 Comment
  1. Pramod Pangerkar 1 week ago
    Reply

    majhya vadilanche sahakari va hasyaabhineta yaana shraddhanjali

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More