‘लॉलीपॉप’ वाटून अंबरनाथमध्ये इंधन दरवाढीचा युवक काँग्रेसतर्फे निषेध – eNavakal
News महाराष्ट्र

‘लॉलीपॉप’ वाटून अंबरनाथमध्ये इंधन दरवाढीचा युवक काँग्रेसतर्फे निषेध

अंबरनाथ- पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना लॉलीपॉपचे वाटप करून इंधन दरवाढीचा अंबरनाथ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने अंबरनाथमध्ये निषेध करण्यात आला.  तब्बल नव्वद रुपयांच्या पुढे गेलेल्या इंधन दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले होते, त्यात नाममात्र कपात करून राज्य सरकारने केंद्र सरकार पाठोपाठ पेट्रोल दरवाढ कमी करून नागरिकांना दिलासा दिला होता, मात्र असे असतानाही दररोज पेट्रोलच्या दरात कधी 20 तर कधी पंधरा पैसे दरवाढ केली जात आहे, दरवाढ नसेल त्यादिवशी आज इंधनामध्ये कोणतीही दरवाढ झाली नाही अशी घोषणा होते. याबद्दल युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी सत्ताधार्‍यांची खिल्ली उडवली. दरवाढ कमी करण्याचे गाजर दाखवत येत असल्याच्या निषेधार्थ उल्हासनगर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनोद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज अंबरनाथला पश्चिमेच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी लॉलीपॉप देत इंधन दरवाढीची आठवण करून दिली.

यावेळी विविध पोस्टरच्या माध्यमातून इंधन दरवाढीसंबंधी लक्षवेधीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यात आल्यानंतर पुन्हा दुसर्‍या दिवसापासून दरवाढ सुरू झाल्याने नागिरकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. भाजप सरकारने नागरिकांना चार वर्षांत फक्त आश्वासने देत विकासाचे लॉलीपॉप दाखवले, असा आरोप युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ठाकूर यांनी केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

वाहन परवान्यासाठी आता शैक्षणिक अट नाही

नवी दिल्ली – वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मिळवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट काढून टाकण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे वयाची...
Read More
post-image
महाराष्ट्र शिक्षण

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

मुंबई – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे. बायफोकल वगळता इतर शाखांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ जूनपर्यंत सुरू राहणार असून पहिली गुणवत्ता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More