लेफ्ट अ पीस ऑफ माय हार्ट इन डोंजा, क्रिकेटपटू सचिनने केले ट्वीट – eNavakal
News मुंबई

लेफ्ट अ पीस ऑफ माय हार्ट इन डोंजा, क्रिकेटपटू सचिनने केले ट्वीट

मुंबई – उस्मानाबादमधील डोंजा गावाकडून भरभरून मिळालेल्या प्रेमानं खासदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारावून गेला. दोन दिवसांपासून डोंजा गावात असलेला सचिन आज मुंबईला परतला. पण मुंबईला परतल्यावर एक ट्विट करत सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मी डोंजात आपल्या काळजाचा तुकडा सोडून आलो’, असं भावूक ट्विट सचिनने केले.

आदर्श सांसद ग्राम योजनेसाठी सचिनने दोन वर्षापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा (ता. परंडा) गावाची निवड केली. तेव्हापासूनच विविध कामांना सुरुवात झाली होती. मात्र, सचिन गावाला भेट देणार का, याची ग्रामस्थांना उत्सुकता होती. अखेरीस त्यांची ही इच्छाही मंगळवारी पूर्ण झाली आणि गावामध्ये अक्षरश: दिवाळीच साजरी झाली. सचिनने या भेटीमध्ये गावातील विकासकामांची पाहणी करण्याबरोबरच ग्रामस्थांशी संवादही साधला. दोन दिवसांच्या भेटीनंतर सचिन संध्याकाळी मुंबईला परतला. या दोन दिवसांत गावकऱ्यांनी दिलेले प्रेम आणि आदरातिथ्याने सचिन भारावून गेला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More