वसई – लिव्ह इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या बाळाला पोटगी देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल वसई न्यायालयाने दिला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडप्याला पती पत्नीचा दर्जा मद्रास उच्च न्यायालयाने दिल्यानंतर वसई न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे.
उभयंतांच्या संमतीने वसईतील एक जोडपे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. त्यानंतर त्यांना एक अपत्य ही झाले होते. त्यामुळे मधल्या काळात लग्नाचा तगादा तरुणीने लावला होता तो पूर्ण न करता त्याने त्रास दिल्यामुळे माहेरी जाऊन तरुणीने वसई न्यायालयात पोटगीसाठी दावा दाखल केला.
दरम्यान, या खटल्याची सुनावणी करण्यासाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर ही यातील तरुण गैरहजर राहिला, त्यानंतर सुनावणी देताना न्यायमूर्ती एस. बी. पवार यांनी तरुणीचे अपील मान्य केले तसेच तरुणीच्या वस्तू दरमहा पाच हजार रुपये पोटगी देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला, या तरुणीच्या वतीने विधिज्ञ यज्ञेश कदम यांनी हा युक्तिवाद केला.