लाहोरला परतताच नवाज शरीफांना मुलीसह अटक – eNavakal
News राजकीय विदेश

लाहोरला परतताच नवाज शरीफांना मुलीसह अटक

लाहोर- भ्रष्टाचार प्रकरणात 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान लंडनहून मायदेशी परतले असून लाहोर विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच त्यांना अटक करण्यात आली. शरीफ यांच्यासोबत त्यांची कन्या मरियमलाही अटक करण्यात आली. यादोघांचेही पासपोर्ट जप्त करण्यात आले असून लाहोरहून त्यांना इस्लामाबाद येथे नेण्यात येणार आहे.
पाकिस्तानातील एका कोर्टाने शरीफ यांना 10 वर्षांची तर मरियम यांना 7 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पत्नीवर लंडनमध्ये उपचार सुरू असल्याने शरीफ तातडीने पाकमध्ये परतू शकले नव्हते. आज ते कन्येसह मायदेशात परतले. लंडनहून परतत असताना अबुधाबी येथे त्यांचे विमान थांबले होते. सुमारे दोन तास उशिराने त्यांचे विमान पाकिस्तानात पोहोचताच त्यांना अटक करण्यात आली. शरीफ यांना रावळपिंडी येथील कारागृहात ठेवण्यात येणार आहे. 25 जुलै रोजी पाकिस्तानात निवडणुका होत आहेत.दरम्यान, शरीफ यांच्या अटकेआधी पाकिस्तानात मोठा तणाव निर्माण झाला होता. लाहोरमध्ये काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हिंसक चकमकी सुरु होत्या. यामध्ये पाच पोलीस जखमी झाले असून 378 जणांना अटक करण्यात आली आहे. लाहोरला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईतील तीन वास्तूंना युनेस्कोचा पुरस्कार

पेनांग- मुंबईतील फ्लोरा फाउंटन, नेसेट एलियाहू सिनागॉग, आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च आणि अहमदाबादमधील विक्रम साराभाई लायब्ररी आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अशा भारतातील...
Read More