लालबाग राजा मंडळातर्फे करियर गाईडन्स व कौन्सिलिंग सेंटर – eNavakal
News आघाडीच्या बातम्या मुंबई

लालबाग राजा मंडळातर्फे करियर गाईडन्स व कौन्सिलिंग सेंटर

मुंबई- आजच्या प्रचंड स्पर्धेच्या धावत्या युगात प्रत्येक विद्यार्थी आपले करिअर यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही अनेक विद्यार्थी आपल्या करिअरच्या दिशा चाचपडताना दिसतात. अनेक प्रकारच्या करिअर संधींच्या भाऊगर्दीत विद्यार्थ्यांने आपले शैक्षणिक करिअर अचूक निवडावे आणि यशस्वी व्हावे, आपले भविष्य उज्वल करावे या महत्वाकांक्षी हेतूने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने इयत्ता नववी व त्यापुढील इयत्तेत शिकणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या करिअरची योग्य दिशा मिळवण्यासाठी ‘करिअर गाईडन्स आणि कौन्सिलिंग सेंटर’ सुरू करण्याचे निश्चित केले आहे.

लालबाग राजा मंडळाने योजिलेल्या करियर गाईडन्स आणि कौन्सिलिंग सेंटरचा उद्घाटन सोहळा सोमवार 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता लालबागचा राजा प्रबोधिनी पेरू कंपाऊंड, लालबाग येथे होणार आहे. सदर कार्यक्रमास मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कौन्सिलिंग सेंटरमधून विविध तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट घेतली जाणार आहे. या टेस्टच्या निकालाच्या आधारावरच या विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे याबाबतचे वैयक्तिक मार्गदर्शन तो विद्यार्थी, पालकांना केले जाणार आहे. या कौन्सिलिंग सेंटरमध्ये मार्गदर्शन घेणार्‍या विद्यार्थ्यांकडून 100 रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार असून याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे मानदसचिव सुधीर साळवी यांनी केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More