‘लालबागच्या राजा’चे २२ तासानंतर विसर्जन – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

‘लालबागच्या राजा’चे २२ तासानंतर विसर्जन

मुंबई – पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज निरोप देत आहेत. तब्बल २१ तासांच्या मिरवणुकीनंतर जनसागराचा निरोप घेऊन जलसागरात विसर्जित होण्यासाठी लालबागचा राजाचे गिरगाव चौपाटीवर आगमन झाले. लाडक्या लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यासाठी भक्तांचा विराट महासागर चौपाटीवर उसळला होता. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. अशा गजरात जल्लोषपूर्ण वातावरणात आज ९च्या सुमारास ‘लालबागचा राजा’ला निरोप देण्यात आला.

पुण्यातील बाप्पाच्या मिरवणुकांची धामधूम रात्रभर सुरू होती. प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी लकडी पूल येथे विसर्जन झाले. महापौर मुक्ता टिळक आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी श्रीमंतांची आरती करून त्यांच्या नयनरम्य मनोहारी रथाचे सारथ्य केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक खेळांचे सादरीकरण करत आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी निरोप दिला. दरम्यान, डीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्याने पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More