लाच प्रकरणातील फिर्यादीची मुळ तक्रारप्रत न्यायालयातून गायब  – eNavakal
News आघाडीच्या बातम्या गुन्हे न्यायालय महाराष्ट्र

लाच प्रकरणातील फिर्यादीची मुळ तक्रारप्रत न्यायालयातून गायब 

नाशिक –  जिल्हयातच नव्हे तर राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर लाच प्रकरणाच्या खटल्यातील दोषारोपाची मुळ तक्रार तसेच पंचांच्या निशाण्याचा दस्ताऐवज न्यायालयातून गायब झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेत सदर खटला संबधीत न्यायालयाकडून काढून घेत दुसऱ्या न्यायालयाकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात अज्ञाताच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे न्यायालयातील शिपायापासून ते वरिष्ठ लिपिका पर्यतचे सर्वच जण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अधिकारी सतीश चिखललीकर, शाखा अभियंता जगदीश वाघ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने देयके मंजूर करण्याच्या मोबदल्यात ठेकेदाराकडून वीस लाखांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सतीश चिखलीकर यांच्या निवासस्थानाची तसेच बॅक लॉकरची झडती घेतली असता सुमारे सतरा कोटीची मालमत्ता मिळून आली होती. चिखलीकर आणि त्यांच्या कुंटूबियांनी बेहिशोबी मालमता जमावल्याने पोलिसांनी चिखलीकरांसह त्यांची पत्नी, वडिलांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू होती.

न्यायालयात या खटल्याची सुनवणी सुरू असतांनाच दोषारोपपत्रात एसीबीने दाखल केलेली मुळ तक्रारदार इरफान शेख यांची फिर्याद तसेच पंचांच्या निशाण्यांचा दस्तावज गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गहाळ झालेल्या दस्तावजाच्या ठिकाणी कोणतीही स्वाक्षरी वा शिक्का नसलेला बनावट तक्रारी अर्ज लावल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. जिल्हा न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश देत संबधीत न्यायालयाकडून खटला तडकाफडकी दूसऱ्या न्यायालयाकडे वर्ग केला आहे.या घटनेमुळे न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांभोवती संशयाचे वातावरण
निर्माण झाले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा देश

भारतीय खेळाडूंना पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचे आदेश

लंडन – टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : उंचे लोग उंची पसंद

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. म्हणजे समाजातल्या मोठ्याकिंवा प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. प्रत्येक राज्यात जाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडात चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये 4 लाखांची लूट

नांदेड – आज पहाटे 4.50 वाजता चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 4 लाख 24 हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरून नेली आहे. चैन्नई ते नगरसोल जाणारी...
Read More
post-image
महाराष्ट्र

धुळ्यात सेनेचे दोन महानगरप्रमुख तुरुंगात; महालेंना दिला डच्चू

धुळे – शिवसेनेतर्फे धुळ्यासाठी दोन महानगरप्रमुख पदांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरप्रमुख असलेले सतिश महाले भूसंपादन मोबदला हडपल्याप्रकरणी अमळनेरमध्ये दाखल गुन्ह्यात सध्या जळगाव कारागृहात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत घनकचरा खात्यातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन 

मुंबई – मुंबई मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांनाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पालिका प्रशासनाने अवलंबलेल्या उदासीन धोरणाच्या निषेधार्थ शेकडो कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू...
Read More