लाखोंच्या खर्चानंतर तरणतलावाचे फिल्टर प्लांट नादुरुस्तच – eNavakal
News महाराष्ट्र

लाखोंच्या खर्चानंतर तरणतलावाचे फिल्टर प्लांट नादुरुस्तच

ठाणे,- ठाणे पालिकेचे भूषण असलेले सर्वात मोठे तरणतलाव कळवा येथे आहे. यशवंत रामा साळवी या नावाने असलेला पालिकेचा तरणतलाव विविध समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. तरणतलावाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा खर्च केल्यानंतरही तरणतलाव दुरवस्थेत आहे. अनेक तक्रारी पालिका प्रशासनाला केल्यानंतरही केवळ आश्वासनावर तक्रारदाराची बोळवण करण्यात येत आहे. फिल्टरप्लांट नादुरुस्त असल्याने तलावातील दूषित पाण्यामुळे पोहायला येणार्‍या मुलांना पोटाचे आणि त्वचेचे विकार जडल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

कळव्याच्या यशवंत रामा साळवी तरणतलाव हा जुना आणि मोठा पालिकेचा तरणतलाव आहे. त्यामुळे या तलावात येणार्‍या सभासदांची संख्याही हजारोच्या घरात आहे. लाखो रुपये खर्च केल्यानंतरही या तलावाचे तीनतेरा वाजले आहेत. मान्यवर तलावाची दुरवस्था आणि दूषित पाण्याने पुन्हा एकदा कळवा तरणतलाव चर्चेत आला. शुक्रवारी पालकांच्या असंख्य तक्रारीनंतर पालिका विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी भेट दिल्यानंतर पालकांनी तरणतलावात पोहण्यासाठी येणारी मुले आजारी पडल्याने त्यांना त्वचेचे आणि पोटाचे विकार जडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरणतलावाच्या फिल्टरेशन प्लांटच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले. तरीही 15 दिवसांपासून पुन्हा तरणतलावातील फिल्टरप्लान्ट बंद पडल्याने दूषित पाण्याने मुलांना ताप, अंगाला खाज येणे, अंगावर बारीक फोड्या आल्याचे जाणवले. त्यामुळे पालकांनी मुलांना स्विमिंगसाठी पाठविणे बंद केले. यापूर्वी मार्चमध्ये तरणतलाव दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. पूर्णतः दुरुस्ती झाल्याशिवाय तरणतलाव सुरू करण्यात येऊ नये, असे पालकांचे म्हणणे होते. तरीही पुन्हा तरणतलाव सुरू करण्यात आला का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी उपस्थित केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरच्या सातपाटी परिसरात यंदा पापलेटच्या उत्पादनात घट

पालघर – राज्यासह जगभरात निर्यात होणार्‍या पालघरच्या सातपाटी परिसरातील पापलेट या मत्स्याच्या प्रकारामध्ये यंदा प्रचंड घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 190 टनांनी घटले...
Read More
post-image
देश

मनोहर पर्रिकरांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद

पणजी – गोव्यामधील मिरामार बीचवर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात...
Read More