लाईव्ह लोकेशन कळणे अयोग्य,व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचरमुळे नेटिझन्स नाराज – eNavakal
Uncategoriz

लाईव्ह लोकेशन कळणे अयोग्य,व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचरमुळे नेटिझन्स नाराज

मुंबई: व्हाट्स अॅपच्या “लाईव्ह लोकेशन ” या फीचरमुळे एखाद्याचे लोकेशन ट्रेस केले जाणे कितपत योग्य आहे ? कारण मी कोणाशी माझी पर्सनल माहिती शेअर करायची हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. त्यामुळे या फीचरचा वापर करायचा की  नाही , यावर नेटिझन्समध्ये चर्चा झडतायत. एखाद्याची पर्सनल माहिती किती सोशल व्हावी यावर बंधन आणायची वेळ आलीय असा बऱ्याच जणांचा सूर आहे.

दरम्यान या चर्चेचे कारण की व्हॉट्सअॅपने नवं फीचर आणलं आहे. व्हॉट्सअॅपवरुन आता  तुम्हाला लाईव्ह लोकेशन शेअर करता येणार आहे.मेसेजिंग दरम्यान कोणी खोटे बोलतेय असे वाटले तर तुम्ही त्या व्यक्तीस लाईव्ह लोकेशन शेअर करायला सांगू शकता. त्यावरून तुम्ही त्या व्यक्तीचे खरे लोकेशन जाणून घेऊ शकता.

मी ट्रेनमध्ये आहे , पोहोचलोच  असं सांगून फसवणाऱ्या व्यक्तीला  तुम्ही लाईव्ह लोकेशन शेअर करायला सांगून रंगेहात पकडू शकता.तसंच एखाद्या वाईट परिस्थितीत तुम्ही सुरक्षित आहे की नाही  हे लाईव्ह लोकेशनच्या मदतीने घरच्यांना कळवू शकाल.व्हॉट्सअॅपवरुन आतापर्यंत  लोकेशन शेअर करता येत होतं ,पण आता  त्याद्वारे लाईव्ह लोकेशन शेअरसुद्धा केले जाऊ शकते.

 

हे फीचर वापरायचे  कसे

यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅटमध्ये जाऊन,अटॅच  वर क्लिक करून नंतर  लोकेशनचा पर्याय निवडावा लागेल . त्यानंतर तुम्हाला कालमर्यादा विचारली जाईल. यामध्ये 15 मिनिट, 1 तास आणि 8 तास असे पर्याय दिसतील, त्यापैकी योग्य पर्याय निवडू शकतो.

लाईव्ह लोकेशन तुम्हाला हवे तेव्हा मॅन्युयली बंद करू शकता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More