लवकरच शेतक-यांचे कर्ज माफ करणार – राहुल गांधी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

लवकरच शेतक-यांचे कर्ज माफ करणार – राहुल गांधी

नवी दिल्ली – राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश येथे सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भरगच्च पत्रकार परिषद घेतली. त्यांनी काँग्रेसला निवडून देणार्‍या जनतेचे आणि विजयासाठी अथक मेहनत करणार्‍या कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्याची घोषणा केली. तसेच आज भाजपाचा झालेला पराभव हा त्यांच्या भ्रष्टाचारी कारभाराचा पराभव असल्याचे सांगितले. नोटबंदी, जीएसटी आणि राफेल विमान खरेदी करार  हे घोटाळे असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. आम्ही आज तीन राज्यांत जिंकलो असून यापुढे संपुर्ण देशभर जिंकू अशी घोषणा केली.

राहुल गांधी यांनी सांगितले की, भ्रष्टाचाराचा बिमोड, लाखो बेरोजगारांना रोजगार, शेतकर्‍यांच्या पिकाला हमीभाव आणि आर्थिक उन्नती ही आश्वासने देऊन भाजपाचे नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले. मात्र त्यांनी या आश्वासनांना हरताळ फासला. भ्रष्टाचार, बेरोजगारी व शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले. भ्रष्टाचारी सरकार म्हणून नरेंद्र मोदींच्या विरोधात पाच राज्यांत जनतेने मतदान केले. नरेंद्र मोदी यांच्याकडून मी खुप काही शिकलो आहे. यापुढे शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी ‘हरित क्रांती’ सारख्या योजना आम्हाला आखाव्या लागतील. श्वेत क्रांती व हरित क्रांती यासारख्या मोठ्या योजना काँग्रेसने भुतकाळात यशस्वी केल्या. यापुढेही शेतकर्‍यांना सुस्थिती व तरुणांना रोजगार हा आमचा मुख्य अजेंडा राहिल.  बसपा व सपा यांच्या विचारधारेत व आमच्या विचारधारेत काहीही फरक नाही. आता ते आमच्या सोबत आहेत आणि मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री आमचाच होणार, अशी खात्री त्यांनी दिली.
ईव्हीएम मशिन नकोच
राहुल गांधी यांना अत्यंत खोचक प्रश्न विचारण्यात आला की, काँग्रेसला तीन राज्यांत विजय मिळाल्यामुळे आता ‘ईव्हीएम’ मध्ये गडबड होते, असे तुम्ही म्हणाल का? त्यावर राहुल गांधी म्हणाले की ईव्हीएम बाबतचा मुख्य मुद्दा आजही आहे. ईव्हीएम मशिन मधील चिपला ‘मॅन्यूप्युलेट’ केले जाऊ शकते. म्हणूनच अमेरिका व इतर देशांनी ईव्हीएम मशिनला विरोध करत चिठ्ठ्या टाकून मते देण्याच्या पध्दतीला स्विकारले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ‘तेजस’ भरारी

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करत आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
देश

पेट्रोल-डिझेल सलग तिसऱ्या दिवशी महागले

मुंबई – देशात लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. आज पेट्रोलच्या दरात २९ पैशांनी तर डिझेलच्या दरात १९ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More