लता मंगेशकर करणार शहीदांच्या कुटुंबियांना १ कोटीची मदत – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

लता मंगेशकर करणार शहीदांच्या कुटुंबियांना १ कोटीची मदत

मुंबई – गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ‘भारत के वीर’ या संस्थेच्या माध्यमातून ही मदत केली जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर यांचा नातू आदिनाथ मंगेशकर यांनी ही माहिती दिली. मास्टर दीनानाथ पुरस्कारांच्या घोषणेवेळी ही मदत जाहीर करण्यात आली आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ७७व्या स्मृतिदिनानिमित्त पुढच्या आठवड्यात २४ एप्रिलला स्मृती सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. या सोहळ्यात शहीदांना सलाम करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या हस्ते पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांच्या कुटुंबीयांसाठी १ कोटींची मदत देण्यात येणार आहे. तर मंगेशकर कुटुंबीय ११ लाखांची मदत करणार आहेत. स्मृती प्रतिष्ठानतर्फे एकूण ७ लाखांचा निधी देण्यात येणार आहे. हा मदतनिधी ‘भारत के वीर’ या संस्थेकडे या स्मृति सोहळ्यामध्ये सोपवण्यात येईल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More