लखनऊत वर्‍हाडाची गाडी कोसळली! २२ जणांना वाचवले, ७ मुले बेपत्ता – eNavakal
देश

लखनऊत वर्‍हाडाची गाडी कोसळली! २२ जणांना वाचवले, ७ मुले बेपत्ता

लखनऊ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आज सकाळी लग्नातून परतणाऱ्या वर्‍हाडाच्या गाडीला भीषण अपघात झाला. ही गाडी इंदिरा कालव्‍यात कोसळली. या गाडीत एकूण २९ वर्‍हाडी होते. त्यापैकी २२ जणांना कालव्यातून बाहेर काढण्यात यश आले आहेत मात्र ७ मुल अद्याप बेपत्ता आहेत. ही मुले पाण्‍याचा प्रवाहात वाहून गेल्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे. एनडीआरएफच्या जवानांकडून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लखनौमधील नगराम येथील पटवा गावाजवळ ही घटना घडली. अपघातातील लोक बाराबंकी येथील राहणारे आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोंबडी, अंडी शाकाहारी माना! संजय राऊत यांची मागणी

मुंबई – ‘अंडे शाकाहारी की मांसाहारी’ याबाबत गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. पण याचे ठोस उत्तर काही अद्याप सापडलेले नाही. मात्र शिवसेना खासदार...
Read More