लक्सझमबर्गला वादळाचा तडाखा! २० जण गंभीर जखमी – eNavakal
विदेश

लक्सझमबर्गला वादळाचा तडाखा! २० जण गंभीर जखमी

पॅरिस – पूर्व फ्रान्समधील लक्सझमबर्गला प्रचंड वादळ निर्माण झाले. या वादळात सुमारे २० जण जखमी झाले असून १४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डचची राजधानी अ‍ॅम्सटर्डडॅम शहराच्या मध्यवर्ती भागात तुफान वादळाचा तडाखा बसला. या ठिकाणी ताशी 128 किमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे काही इमारतींचे नुकसान झाले. नदीकिनारी राहणाऱ्यांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले. तर कारजेन्ग आणि पेटेंजे कॉमन्समध्ये मोठे नुकसान झाले. कारजेन्गमध्ये सुमारे 100 घरांचे नुकसान झाले. तर पेंटगेमध्ये सुमारे 60 घरे पत्त्यासारखी कोसळली. याठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. तर बाशारेज शहरात सुपरमर्केटचे, मोटारींचे नुकसान झाले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानाकडून याठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पडणाऱ्या वस्तूंपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

नैराश्याचा धंदा करणाऱ्यांना जनतेने आरसा दाखवला, कंगनाचा दीपिकाला टोला

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली. त्यातच आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने कंगनाने पुन्हा एकदा बॉलीवुड विश्वाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईकरांना दिलासा, २० टक्क्यांवरून पाणीकपात १० टक्क्यांवर

मुंबई – मुंबईची तहान भागवणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली असल्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांवर करण्यात आली आहे. २१ ऑगस्टपासून...
Read More
post-image
महाराष्ट्र

देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी

मुंबई – राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील शासन निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार पार

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ३६१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ४२७ जणांना गेल्या २४...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जम्मू-काश्मीरमधील १० हजार जवानांना माघारी बोलावले, केंद्र सरकारचा आदेश

श्रीनगर – निमलष्करी दलाबाबत केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलेल्या १० हजार जवानांना माघारी बोल‌वण्याचा निर्णय घेण्यात आला...
Read More