रोहित शेखर यांची तोंड दाबून हत्या, शवविच्छेदन अहवालामधून झाले उघड – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

रोहित शेखर यांची तोंड दाबून हत्या, शवविच्छेदन अहवालामधून झाले उघड

नवी दिल्ली – उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर यांची तोंड दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालामधून उघड झाली आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर याचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

ऐन लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर तिवारी यांचा मंगळवारी दिल्लीत राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता. रोहित शेखर दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत राहात होते. दुपारी मॅक्स रुग्णालयामध्ये तातडीचा दूरध्वनी आला, त्यानंतर रुग्णवाहिकेतून रोहित शेखर यांना रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच ते मरण पावल्याचे घोषित करण्यात आले. रोहित शेखर यांच्या निधनाबद्दल शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. दरम्यान एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी रोहित शेखर यांच्या निधनाबद्दल मोठा खुलासा केला आहे. रोहित शेखरच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम अहवालातून रोहित शेखर याचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे उघड झाले आहे. त्याची तोंड दाबून हत्या करण्यात आली असावी, असेही या अहवालात म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

विकिलीक्सच्या आसांजेवर आणखी १७ गुन्हे दाखल

वॉशिंटन – अमेरिकेने विकिलीक्सचे प्रकाशक जूलियन असांजेवर गुप्‍त माहिती अधिनियम अतंर्गत 17 नवे आरोप लावले आहेत. अमेरिकेने युकेकडून असांजेच्या प्रत्यापर्णणाची मागणी केली आहे. लंडनच्या बेलमार्श...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखरावर मृत्यू

काठमांडू – भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखर उतरतांना पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. त्यांचे पती शरद कुलकर्णी देखील त्यांच्या सोबत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More