रोहित शर्माबरोबर कुठलेच मतभेद नाहीत – विराट कोहली – eNavakal
News क्रीडा महाराष्ट्र

रोहित शर्माबरोबर कुठलेच मतभेद नाहीत – विराट कोहली

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि सलामीचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या याच्याबरोबर कुठलेच मतभेद आपल्यात नाहीत असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याने रोहित शर्माबरोबरचे मतभेदांचे वृत्त फेटाळून लावले. आपणसुद्धा बातम्यांमधूनच रोहित शर्माबरोबर माझे मतभेद झाल्याचे ऐकले होते. पण त्यात तथ्य नसल्याचे विराट कोहलीने सांगितले.

विंडीज दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वी कर्णधार विराट आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीदेखील रोहित आणि विराटमध्ये मतभेद असल्याचे वृत्त फेटाळून लावले. खेळापेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नाही. मी, विराट किंवा संघामध्ये कोणीही मोठे नाही. संघाच्या हिताच्या दृष्टीने त्याने खेळ केला. संघात मतभेद असतील तर तुम्हाला सर्व फॉर्मेटमध्ये सातत्य राखता येत नाही. मी ड्रेसिंग रुमचाच भाग होतो आणि तिथे असा काही मूर्खपणा नसल्याचे रवी शास्त्री
यांनी सांगितले.
विश्वचषक स्पर्धेनंतर भारताचा पराभव झाल्यावर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. रोहितने विराटची पत्नी अनुष्का हिला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर प्रथम माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या याबाबत पत्रकार परिषदेत काय उत्तर देणार याची उत्सुकता सर्वच क्रिकेटप्रेमींना लागली आहे. यावर भाष्य करताना विराट म्हणाला, संघात तसं काहीच नाही. ड्रेसिंग रुमचे वातावरण चांगले नसते तर दोन वर्षांत संघाच्या कामगिरीचा आलेख चढता राहिला नसता. त्यामुळे संघात वाद नाही. सारेकाही ठिकठाक आहे, अशी चर्चा होणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे.
ड्रेसिंग रुममधील वातावरण खेळीमेळीचे आहे. या बातम्या पसरवण्याचा कोणाला फायदा होतोय हेच आपल्याला कळत नसल्याचे विराटने सांगितले. गेल्या चार वर्षांत भारतीय संघाला 7 व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आणले. संघात दुफळी आणि वाद असता तर ते शक्य झाले असते का? असा सवाल विराटने यावेळी केला.
अजिंक्य रहाणे आता जरी फॉर्मात नसला तरी तो आमच्या संघाचा आधारस्तंभ आहे. कसोटीत संयमी खेळी करण्यासाठी लागणारे सगळे गुण रहाणेकडे असल्याचे विराट म्हणाला. मधल्या फळीतील घसरगुंडीसाठी आपण कोणाला दोष देत नाही. पण भविष्यात चौथ्या क्रमांकासाठी चांगला फलंदाज बघून हा प्रश्न सोडवण्याचा आपला प्रयत्न असेल. सध्या संघासोबत असलेला सहाय्यक स्टाफ आपल्याला तरी पसंत आहे. परंतु शेवटी त्याबाबतचा निर्णय सीएसी समितीने घ्यायचा आहे. त्याबाबत समितीशी चर्चा करायला आवडेल, असेही विराटने सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई-पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल इतिहासजमा

पुणे – मुंबई पुण्याला जोडणारा बोरघाटातील अमृतांजन पूल आज रविवारी तोडण्यात आलाय. सध्या करोनामुळे असलेल्या लॉकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याने हे काम करण्यात आले. द्रुतगती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनाला सोलापुरात गालबोट, विमानतळ परिसरात आग

सोलापूर – दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आले असताना काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडल्याने मोठी आग सोलापुरात लागली आहे. सोलापूर विमानतळ परिसरात ही आग लागली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More