रोड रेज प्रकरणात नवज्योतसिंह सिद्धू निर्दोष – eNavakal
देश मनोरंजन

रोड रेज प्रकरणात नवज्योतसिंह सिद्धू निर्दोष

नवी दिल्ली  – १९८८च्या रोड रेज  मारहाणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर करत नवज्योतसिंह सिद्धूला दोषी ठरविले असून एक हजार रुपयांच्या दंडासह मुक्तता करण्यात आली आहे. तर सदोष मनुष्यवध प्रकरणात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

हरियाणा उच्च न्यायालयाकडून नवज्योतसिंह सिद्धूला 2006 साली तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला आव्हान देत सिद्धूने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेली अनेक वर्ष यावर युक्तिवाद सुरु होत होता. या युक्तीवादानंतर अखेर अज सर्वोच्च न्यायालयाने सदोष मनुष्यवध प्रकरणात त्याची निर्दोष मुक्तता केली असून याप्रकरणात सिद्धूचा तुरूंगावास टळला आहे.

३० वर्षांवूर्वी कारमधून जात असताना पटियाला येथे गुरनाम सिंह या वृद्ध व्यक्तीशी भांडण झाले होते. या भांडणात सिद्धूकडून वृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीतच त्या वृद्धाचा मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर पोलिसांनी सिद्धू आणि त्याचा मित्र रुपिंदर सिंह सिद्धूला हत्या केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ट्रायल कोर्टाकडून सिद्धूची मुक्तता करण्यात आली होती.

त्यानंतर हे प्रकरण पंजाब सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले. २००६ मध्ये सुप्रीम कोर्टाने या दोघांना दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणामुळे सिद्धूला लोकसभा सदस्यात्वाचा राजीनामा द्यावा लागला होता.

 

 

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More