रॉजर फेडररबाबत असे प्रथमच घडले – eNavakal
क्रीडा विदेश

रॉजर फेडररबाबत असे प्रथमच घडले

लंडन – यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत रॉजर फेडररला उपांत्यपूर्व फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनने त्याला 5 सेटमध्ये पराभूत केले. फेडररने या लढतीत पहिले 2 सेट जिंकून चांगली सुरुवात केली. तिसर्‍या सेटमध्ये त्याने 5-4 अशी आघाडीदेखील घेतली होती. तसेच पहिल्या ड्युसमध्ये देखील फेडररने आघाडी घेतली होती. त्यावेळी फेडररला मॅच पॉईंट मिळाला होता. जर फेडररने त्यावेळी 1 गुण मिळवला असता तर या सामन्यात त्याचा विजय निश्चित होता आणि उपांत्य फेरीतील प्रवेशदेखील त्याचा पक्का होता. पण फेडररने या स्पर्धेत कधी नव्हे तो मॅच पॉईंट गमावला. त्याची मोठी किमत मग फेडररला द्यावी लागली. तेथूनच अँडरसनने या सामन्यात जोरदार कमबॅक करून तो सेट जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. त्यानंतर पुढचे 2 जिंकून त्याने आपल्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

औरंगाबादमधील तलावात बुडून एकाचा मृत्यू

औरंगाबाद – तलावात पोहण्यासाठी आलेल्या तीन युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबादमधील कागजीपुरा आज दुपारी घटना घडली. नसीम खान मुबीन...
Read More
post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेत भारताला चांगला खेळ करावा लागेल-राहुल द्रविड

मुंबई – आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर भारताला चांगला खेळ करावाच लागेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि जुनिअर भारतीय संघाचे मुख्य...
Read More
post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More