रे रोड येथे तरुणाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीसह सात जणांना अटक – eNavakal
News मुंबई

रे रोड येथे तरुणाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीसह सात जणांना अटक

मुंबई- रे रोड येथे मैफुजुल युनूसअली शेख ऊर्फ कार्टुन या तरुणाच्या तिक्ष्ण हत्याराने वार करून पळून गेलेल्या मुख्य आरोपीसह सात जणांना रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मंगेश अशोक सरजिने, प्रथमेश विजय तरपे, रोहन राजू खेडेकर, हृतिक विकास कदम, अभिषेक संतोष पाटील ऊर्फ मॅडी, निलेश दिनेश ओझा ऊर्फ निकू आणि अमीत राजेंद्र मिश्रा अशी या सात आरोपींची नावे आहेत. ते सर्व जण घोडपदेव, काळाचौकी आणि शिवडीचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रेयसीसोबत फिरत असताना पाहिल्यानंतर मारहाण केल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मैफुजुल शेख हा रे रोड परिसरात राहात होता. दोन दिवसांपूर्वी त्याची काही अज्ञात मारेकर्‍यांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली होती. त्याचा मृतदेह रेल्वे ब्रिजजवळ टाकून मारेकरी पळून गेले होते. याप्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांत हत्येचा गुन्हा नोंद होताच आरोपींच्या अटकेसाठी विशेष कृती दलाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज घेतल्यानंतर मारेकर्‍याचे फुटेज स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे आरोपींचे डेव्हलप केलेले फोटो खबर्‍यांना दाखविल्यानंतर त्यातील एक आरोपी हृतिक कदम असल्याचे इस्लाम शेख याने ओळखले. या माहितीनंतर घोडपदेव येथून हृतिकला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या चौकशीत त्याने या हत्येची कबुली देताना गुन्ह्यांतील मुख्य आरोपी मंगेश सरजिनेसह इतर पाच जणांची नावे सांगितली. त्यानंतर या सहा जणांना काळाचौकी आणि शिवडी परिसरातून पोलिसांनी अटक केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईतील तीन वास्तूंना युनेस्कोचा पुरस्कार

पेनांग- मुंबईतील फ्लोरा फाउंटन, नेसेट एलियाहू सिनागॉग, आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च आणि अहमदाबादमधील विक्रम साराभाई लायब्ररी आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अशा भारतातील...
Read More