रेशनिंगवरचा गहू सुपर मार्केटमध्ये विकणारे पोलिसांच्या जाळ्यात  – eNavakal
गुन्हे मुंबई

रेशनिंगवरचा गहू सुपर मार्केटमध्ये विकणारे पोलिसांच्या जाळ्यात 

अंबरनाथ – गोरगरिबांसाठी असणारा  रेशनिंग दुकानात मिळणारा गव्हाची  खुल्या बाजारात विक्री करून  काळाबाजार करणारया तिघांना उल्हासनगर गुन्हे शाखेने  अटक केली. अंबरनाथ एमआयडीसीतील पटेल रिटेलच्या गोडाऊनमध्ये ही कारवाई करण्यात आली.
अंबरनाथच्या पटेल रिटेल कंपनीशी संबंधित पटेल आर मार्ट नावाची सुपरमार्केट चेन कल्याण,डोबिवली,शहाड, अंबरनाथ,बदलापूर,उल्हासनगर या सारख्या अनेक शहरांमध्ये आहे. याच पटेल आर मार्टचे   अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये  रेशनिंग दुकानदार शंकर मदार याने  त्याच्या टेम्पोत ११ लाख १२ हजार रुपयांचा रेशनिंगचा गहू विक्रीसाठी आणला. हा सर्व गहू ठाणे,कल्याण आणि अंबरनाथमधील रेशन दुकानातील असल्याचे समोर आले आहे. पटेल रिटेलचे सुपरवायझर नंदू माहेश्वरी यांनी हा  गहू खरेदी केला,  उल्हासनगर गुन्हे शाखेनं गोडाउनवर धाड मारून टेम्पोसह गहू जप्त केला. हा गहू रेशनिंगचाच असल्याची  माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी शंकर मदार आणि नंदू माहेश्वरी यांच्यासह टेम्पो चालकाला  पोलिसांनी अटक केली आहे.  आज  गुरुवार १४ रोजी न्यायालयात हजर केले असता सर्वाना   १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More