रेल्वे यंत्रणेवर आता ड्रोनची नजर – eNavakal
देश वाहतूक

रेल्वे यंत्रणेवर आता ड्रोनची नजर

नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठे सरकारी जाळे म्हणून रेल्वे यंत्रणेकडे बघितले जाते. या सर्वात मोठ्या यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी आता चक्क तिसरा डोळा सहकार्य करण्यासाठी धावून येणार आहे. या तिसऱ्या डोळ्याद्वारे दिल्लीतल्या रेल भवनाची नजर देशभरातल्या रेल्वे प्रकल्पांवर असणार आहे. भारतीय रेल्वेने आपल्या देशभरातल्या प्रकल्पांची माहिती मिळवण्यासाठी ड्रोनकॅमेराचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी प्राथमिक चाचणी म्हणून त्याची सुरुवात झाली होती. पण यापुढे रेल्वे प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी, ट्रॅकची देखभाल कशी चालू आहे हे पाहण्यासाठी आणि रेल्वेच्या इतर महत्वाच्या बांधकामांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे.

आज यासंदर्भातलं अधिकृत पत्रक काढून या निर्णयाची माहिती देण्यात आली. तसेच रेल्वेच्या विविध विभागांना ड्रोनचा वापर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीतल्या रेल्वेमंत्रालयातील अधिकाऱ्यांना जमिनीवरच्या हालचालींनवर काय चालू आहे याचा संपूर्ण आढावा मिळणार आहे.  यात्रा, उत्सवाच्या निमित्तानं एखाद्या ठराविक रेल्वे स्टेशनवर गर्दी होणार असेल तर त्यावेळी कसला अनुचित प्रकार घडू नये यासाठीही ड्रोन कॅमेरा वापरण्यात येणार आहे. यामध्ये केंद्र सरकारचा महत्वाकांशी प्रकल्प बुलेट ट्रेनच्या कामावरही या ड्रोनची नजर असणार आहे.  महाराष्ट्रासह देशभरात मागच्या काही दिवसांपूर्वी ज्या रेल्वे ट्रॅक उखडण्याच्या घटना झालेल्या होत्या, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीही ड्रोन कॅमेरे प्रभावी ठरतील असे, रेल्वे मंत्रालयाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल सक्सेना  म्हटले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खासदार नवनीत राणा यांची प्रकृती स्थिर, आयसीयूतून सामान्य कक्षात हलवले

मुंबई- कोरोनाचा संसर्ग झाल्याने लिलावती रुग्णालयात उपचार घेत आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांना आयसीयूतून सामान्य कक्षात हलवण्यात आले आहे. प्रकृतीत थोडी सुधारणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पाकिस्तानची वेबसाईट हॅक, भारताचा तिरंगा फडकला

नवी दिल्ली- आज देशात स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी पाकिस्तानच्या वेबसाइट्सवरही शुभेच्छांचे संदेश दिसून आले आहेत. पाकिस्तानच्या फातिमा जिन्ना महिला विद्यापीठासह...
Read More
post-image
विदेश

९० दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करण्याचा डोनाल्ड ट्रम्पचा आदेश

न्यूयॉर्क – काही दिवसांपूर्वी अमेरिकेने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घातली होती. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाईटडान्सला ९० दिवसांत अमेरिकेतील टिकटॉकची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

अभिमानास्पद! कॅप्टन अमोल यादव यांनी बनविले भारतीय बनावटीचे पहिले विमान

मुंबई – आज भारताच्या स्वातंत्र्य दिनी मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून यावी अशी ऐतिहासिक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप येथे राहणारे कॅप्टन अमोल शिवाजी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचं एक आदर्श कुटुंब, पार्थ पवारांविषयीचा प्रश्न एका मिनिटांत सोडवतील-राजेश टोपे

जालना – ‘पार्थ पवार अपरिपक्व आहेत, त्यांच्या शब्दाला कवडीची किंमत देत नाही, असं शरद पवार यांनी म्हटल्यानंतर राष्ट्रवादीत अंतर्गत वाद असल्याचं बोललं जात आहे....
Read More