रेल्वेमधून युवतीला फेकणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या  – eNavakal
गुन्हे मुंबई

रेल्वेमधून युवतीला फेकणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या 

नवी मुंबई- जुई नगर रेल्वे स्टेशन येथे एका युवती कडील  चीज वस्तू  हिसकावून घेत तिला लोकल बाहेर ढकलून पळून गेलेल्या आरोपीस वाशी  रेल्वे पोलिसांनी आज  अटक  केली आहे.  घराची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्याने हे केले असल्याचे समोर आले आहे. सी सी टीव्ही मुळेच या गुन्ह्याची उकल झाली आहे.
संतोष केकाण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो कल्याण मधील शहाड येथे राहणार आहे. 3 डिसेम्बर रोजी वाशी येथे राहणारी ऋतुजा बोडके हि युवती बडोदा येथे संगीताची परीक्षा देतुन परतीचा प्रवास करून रेल्वेने पनवेल येथे उतरली होती.  रात्री अकरा बावीस ची लोकल पकडून ती वाशीच्या दिशेने निघाली होती. ती ज्या डब्यात बसली होती त्यात अन्य कोणीही नव्हते. मात्र मान सरोवर   येथे एक युवक तिच्या डब्यात शिरला सुरवातीला तो शांत बसला मात्र नेरुळ स्टेशन मधून गाडी बाहेर पडून जुई नगर स्टेशन कडे येत असताना त्याने ऋतुजाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असता ऋतुजाने त्याचा प्रतिकार केला. या झटापटीत त्याने मोबाईल आणि तिच्या कानातील डूल हिसकावून घेतले तेवढ्यात जुई नगर रेल्वे स्टेशन जवळ येत असल्याने पळून जाण्याच्या इराद्याने तो दरवाजात आला मात्र त्याच्या मागोमाग ऋतुजा सुद्धा आली व तेथेही दोघांची झटपट झाली असता त्याने ऋतुजाला थेट लोकल बाहेर ढकलून दिले. सुदैवाने त्यावेळी लोकल जुई नगर रेल्वे स्टेशन मध्ये शिरत असल्याने गाडीचा वेळ कमी झाला असल्याने ऋतुजा खाली कडूनही तिला गंभीर इजा झाली नाही.
या बाबत तिने वाशी  रेल्वे पोलिस  ठाण्यात गुन्हा नोंद केला होता.  पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने हलवत सी सी टीव्ही चे फुटेज तपासले असता हा युवक सुरवातीला मानसरोवर  रेल्वे स्टेशन वर डब्यात बसल्याचे आढळून आले मात्र त्याची ओळख पटत नव्हती. मात्र अधिक फुटेज तपासले असता त्याला एका व्यक्तीने मान सरोवर   रेल्वे स्टेशन बाहेर सोडलेले दिसून आले विशेष म्हणजे त्या गाडीचा क्रमांक ही दिसून आला. त्या क्रमांकावरून पोलिसांनी गाडी मालकाचा शोध काढला असता ती गाडी विपुल पाटील यांची असल्याचे समोर आले. विपुल पाटील यांची चौकशी केली असता त्याचा आणि या गुन्ह्याचा समंध नसल्याचे समोर आल्यावर त्यांना सी सी टीव्ही दाखवल्याने त्याने ज्याला गाडीतून सोडले तो त्यांचा मित्र असून त्याचे नाव संतोष केकाण आहे असे समोर आले. दोन दिवसापूर्वी त्याच्या घरी पोलिसांनी धडक मारली मात्र अंधाराचा फायदा घेत त्याने पलायन केले. आज सकाळी तो शीळ  फाट्यावरील पूजा पंजाब ढाब्यावर  असल्याची टीप पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित हालचाल करीत सापाळा  रचून दुपारी अटक केले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश पाटील यांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

ट्रेकिंग करणार्‍या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नाशिक – नाशिकच्या प्रसिद्ध पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करणार्‍या एक तरुणावर काल सकाळी बिबट्याने हल्ल्यात केला. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला परंतु बिबट्या हाती...
Read More
post-image
News देश

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट वादाच्या भोवर्‍यात! चित्रपटासाठी गीत लिहिले नाही! जावेद अख्तर

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने या चित्रपटात नरेंद्र...
Read More