रेल्वेच्या तिनही मार्गावरील उद्याचा मेगाब्लॉक आजचं! – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

रेल्वेच्या तिनही मार्गावरील उद्याचा मेगाब्लॉक आजचं!

मुंबई –  पश्चिम, मध्य आणि  हार्बर रेल्वेवर आज शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तर उद्या रविवारी कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही. मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंडपर्यंत ब्लॉक आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही याचा परिणाम होणार आहे. दरम्यान, दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर, सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस माटुंगा ते मुलुंडमध्ये धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.

मुंबईकरांना दर रविवारी प्रवासादरम्यान रेल्वेच्या मेगाब्लॉकला सामोरे जावे लागते. परंतु, मुंबईकरांना उद्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार नाही. रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मध्यरात्रीनंतर १ ते सकाळी ६ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावर, सीएसएमटी-कुर्ला/माहीमपर्यंत दोन्ही मार्गांवर आज मध्यरात्रीनंतर १. २० ते सकाळी ६.२०पर्यंत ब्लॉक असणार आहे . सीएसएमटी-वडाळा ते पनवेल-बेलापूर-वाशी मार्गावर पहाटे ४.३२ ते स. ६.४६पर्यंत आणि पनवेल-बेलापूर-वाशी ते सीएसएमटीपर्यंत पहाटे ४.०३ ते स. ५.५९पर्यंत सेवा खंडीत करण्यात येणार आहे. तर सीएसएमटी ते वांद्रे-अंधेरीपर्यंत पहाटे ४.२६ ते स. ६.२१ आणि वांद्रे-अंधेरी ते सीएसएमटीपर्यंत पहाटे ५.१३ ते स. ६.१६पर्यंत सेवा खंडीत राह्नार आहे. या मार्गावर सीएसएमटी-कुर्ला आणि कुर्ला-पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवल्या जातील. तर पश्चिम रेल्वेवरही मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ स्थानकापर्यंत दोन्ही मार्गांवर आज मध्यरात्रीनंतर १२.३० ते पहाटे ४.३०पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा स्थानकात थांबणार नाहीत. चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकल माहीम, माटुंगा, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी स्थानकात थांबणार नाहीत. तसेच या लोकल लोअर परळ, माहीम, खार स्थानकात दोनवेळा थांबतील. या ब्लॉकमुळे रात्री उशिरा प्रवास करताना प्रवाशांची काही प्रमाणात अडचण होणार आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेटहून सुटलेल्या लोकल महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा स्थानकात थांबणार नसून चर्चगेटच्या दिशेकडील रेल्वे लोअर परळ, माहीम स्थानकामध्ये थांबणार नसल्याची माहिती रेल्वे  प्रशासनाने दिली आहे.

या फेऱ्या रद्द होणार

– विद्याविहारमधून सुटणारी स. ५.३९ वाजताची कुर्ला-कल्याण लोकल

– दादरहून सुटणारी स. ६.४८ची कल्याण लोकल

– दादरहून सुटणारी स. ८.०७ची कल्याण लेाकल विद्याविहारहून स. ८.२१ वा. सुटेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

वयाच्या ७९ व्या वर्षी राज्यपालांनी किल्ले शिवनेरी केला सर

पुणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

भारतीय क्रिकेटचा गौरवशाली अध्याय संपला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई – माजी क्रिकेटपटू, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू चेतन चौहान यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे, महान खेळाडू सुनील गावस्कर यांच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत  ३२० नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३२० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून ३४१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३२० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादु्र्भाव वाढत असताना अनेक नेत्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. आता माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनाही कोरोनाची लागण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज नव्या ११ हजार १११ रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे...
Read More