रेल्वेच्या डब्यांबाहेर आरक्षणाची यादी चिकटवण्याची प्रथा बंद – eNavakal
महाराष्ट्र वाहतूक

रेल्वेच्या डब्यांबाहेर आरक्षणाची यादी चिकटवण्याची प्रथा बंद

मुंबई – लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करताना प्रवाशाकडे रिझर्व्हेशन असले तरी रेल्वेच्या डब्याबाहेर लावण्यात येणारी आरक्षणाची यादी तपासल्याशिवाय प्रवासी पुढे जात नाही. १ सप्टेंबरपासून ही यादी प्रवाशांना शोधूनही सापडणार नाही कारण ही यादी डब्याबाहेर लावण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. हा नियम संपूर्ण देशभरात लागू करण्यात आलेला आहे. या निर्णयाची माहिती ज्या प्रवाशांना नाही त्या प्रवाशांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.

देशातील ७० टक्क्यांहून अधिक रेल्वे तिकीटे आता इंटरनेटद्वारे विकत घेतली जातात. तिकीट विकत घेतावेळी प्रवाशाचा मोबाईल नंबर व इमेल आयडी विचारला जातो. तिकीटाचा सगळा तपशील नोंदणी झाल्यानंतर मोबाईल आणि ईमेलवर पाठवला जातो. त्यामुळे डब्याबाहेर लावण्यात येणारी यादी बघण्याची गरज फारशी उरलेली नाही आहे. यामुळेच ही यादी डब्यांबाहेर लावण्याची प्रथा बंद करण्यात येत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मुंबईतील काही स्थानकांत चार महिन्यांपूर्वीच हा नियम लागू करण्यात आला होता ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल टर्मिनस या स्थानकांचा समावेश होता. ही यादी बंद करण्याचा निर्णय घेत असतानाच आता आरक्षणाची माहिती देणारे इलेक्ट्रॉनिक फलक किंवा किऑस्क लावण्याचा विचार सुरू आहे. या किऑस्कवर पीएनआर नंबर टाकला की प्रवाशाला त्याच्या आरक्षणाचा तपशील तपासता येणार आहे.

रिझर्व्हेशन यादी न लावण्याच्या निर्णयामुळे अंदाजे २८ टन कागदाची बचत होणार आहे. सध्या ई तिकीट, एसएमएसवर रिझर्व्हेशनची माहिती पाठवणे, रेल्वे स्थानकांवर डिजीटल डिस्प्ले अशा वेगवेगळ्या पर्यांयावर रेल्वेकडून भर दिला जात आहे. तसेच प्रवासी १३९ क्रमांक डायल करून देखील रेल्वेची माहिती मिळवू शकतात, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

केंद्रीयमंत्री अनुप्रिया पटेलने भाजपाची साथ सोडली

लखनऊ – केंद्रीय मंत्री व अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी भाजपाची साथ सोडली आहे. भाजपाने आमच्या सहकार्‍यांना सांभाळून घेतले नाही. आमच्या तक्रारीचे निरसन...
Read More
post-image
News देश

सराफांच्या भिशीवर बंदी सरकारने अध्यादेश काढला

नवी दिल्ली- दाग-दागिने विकणार्‍या सराफांच्या भिशीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसा अध्यादेशच आज सरकारने काढला. या अध्यादेशान्वये सराफ चालवत असलेल्या अल्पबचत योजनेवर बंदी...
Read More
post-image
News मुंबई

शक्ती मिल बलात्कार प्रकरण! हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यात फाशी नाही, तर बलात्कारात का?

मुंबई- एखाद्याची हत्या करणे अथवा शरीराचा एखादा भाग धडापासुन वेगळा करणे अशा अमानवी स्वरूपाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षेची तरतूद नाही . त्या मुळे हत्ये पेक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More