रेल्वेची साडेसोळा लाखांची कॅश चोरट्यांनी पळविली – eNavakal
News गुन्हे मुंबई

रेल्वेची साडेसोळा लाखांची कॅश चोरट्यांनी पळविली

मुंबई  – मानखुर्द रेल्वे स्थानकातील तिकिट काऊंटरची जमा झालेली कॅश घेऊन जाणार्‍या एका रेल्वे कर्मचार्‍याला घातक शस्त्रांचा धाक दाखवून चारजणांच्या टोळीने साडेसोळा लाख रुपयांची कॅश पळवून नेल्याची घटना बुधवारी दुपारी मानखुर्द परिसरात घडली. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा मानखुर्द पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी करीत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या रॉबरीच्या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. वैभव भवन चव्हाण हे रेल्वेमध्ये कामाला आहेत. सध्या त्यांची नेमणूक मानखुर्द रेल्वे स्थानकातील तिकिट काऊंटर होती. बुधवारी दुपारी पावणेचार वाजता ते मानखुर्द रेल्वे स्थानकातील तिकिट काऊंटरची 16 लाख 58 हजार 212 रुपयांची कॅश घेऊन त्यांच्या कार्यालयात घेऊन जात होते. वैभव चव्हाण हे त्यांच्या सहकार्‍यासोबत त्यांच्या वाहनाने जात असताना मानखुर्द येथील सर्व्हिस रोडवरील धोबीघाट परिसरात येताच एका कारने त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक केले. काही कळण्यापूर्वीच कारमधून चारजण उतरले आणि त्यांनी चाकू आणि पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्याकडील कॅश घेऊन कारमधून पळून गेले. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर वैभव चव्हाण यांनी मुख्य नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली होती. या माहितीनंतर मानखुर्द पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी तिथे धाव घेतली होती. याप्रकरणी वैभवच्या जबानीवरुन मानखुर्द पोलिसांनी पळून गेलेल्या चारही आरोपीविरुद्ध रॉबरीच्या गुन्ह्यांची नोंद करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखा आणि मानखुर्द पोलिसांचे सात ते आठ पथकाची नियुक्ती करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More
post-image
News मुंबई

रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक

मुंबई-मध्य आणि हार्बर मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 19 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गावर सकाळी 11.20 वाजल्यापासून ते...
Read More