रेरात ऑनलाईन कागदपत्रे जमा करणे शक्य – eNavakal
News मुंबई

रेरात ऑनलाईन कागदपत्रे जमा करणे शक्य

मुंबई,- रियल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅक्ट (रेरा)ने गृहखरेदीदारांना आणखी एक दिलासा दिला आहे. रेरामध्ये तक्रार दाखल करायची असेल तर महारेराच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार दाखल करावी लागते. तसेच तक्रार केलेली कागदपत्रे रेराच्या कार्यालयात जमा करावी लागतात. ग्राहकांना रेरा कार्यालयात जावे लागू नये म्हणून रेराने तक्रार आणि त्यासंबंधीची कागदपत्रे ऑनलाईन जमा करता येणार आहेत.

रेरा अधिकार्‍यांनी सांगितले की, तक्रार केल्यानंतर संबंधित कागदपत्रे कार्यालयात जमा करावी लागतात. कागदपत्रे जमा केल्याशिवाय विकासकांना नोटीस पाठवणे शक्य नाही, पण यामध्ये ग्राहकांचा वेळ वाया जातो तसेच येण्या-जाण्याचा त्रासही होतो. यावर उपाय म्हणून रेराने ही सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच कागदपत्रांसोबत 5000 फीही ऑनलाईन जमा करता येणार आहे. तसेच विकासकाला नोटीसही पाठवावी लागणार नाही. कारण ग्राहक ज्या प्रकल्पाची तक्रार करेल त्याची माहिती विकासकाला नोंदणी केलेल्या प्रकल्पात पाठवण्यात येईल. तसेच विकासकाला एसएमएस पाठविण्यात येईल. यामुळे नोटीस पाठवण्याचा खर्च आणि वेळ वाचणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

प्रथमच शरद पवारांच्या डोळ्यासमोर फलटणमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांत राडा

सातारा – लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघातील बंडाळी रोखण्यासाठी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवारांनी माढ्यातून उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. स्टीव्ह इरविन यांना ‘क्रोकोडाइल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेशात अटक

सहारनपूर – सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या संशयितांकडून...
Read More