रेड झोनमधील विमानतळ सुरू करणे अत्यंत धोक्याचे – गृहमंत्री – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रेड झोनमधील विमानतळ सुरू करणे अत्यंत धोक्याचे – गृहमंत्री

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. त्यातच केंद्र सरकारने २५ मेपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. अशावेळी रेड झोनमध्ये विमानसेवा सुरू करणे आणखी धोक्याचं ठरेल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच रेड झोनमधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे. स्वॅब शिवाय प्रवाशांच्या नुसत्या थर्मल स्कॅनिंगचा काय फायदा? सध्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव्ह प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, देशात विमानसेवा सुरू होणार असली, तरी महाराष्ट्रात विमान वाहतूक सुरू न करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे राज्य सरकार विमानसेवा सुरू करण्यासाठी उत्सुक नाही.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात कोरोनाबाधित १३ नव्या रूग्णांची भर

सोलापूर – सोलापुरात आज कोरोनाबाधित १३ नव्या रूग्णांची भर पडली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता ५९ झाली आहे. तर एकूण...
Read More
post-image
विदेश

अमेरिकन कंपनीकडून कोरोनावरील लसीची मानवी चाचणी सुरू

कॅनबरा – कोरोना व्हायरसचा जगभर कहर सुरू असताना आता एक आशेचा किरण दिसू लागला आहे. एका अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनीने यावर लस शोधली आहे. या...
Read More
post-image
देश मुंबई

मुंबई शेअर बाजारात तेजी

मुंबई – जगभरातील शेअर मार्केटमधून आलेल्या सकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारातही आज सकाळी तेजीचे वातावरण होते. सकाळी तेजीत उघडलेल्या बाजारात निफ्टी ९,१००च्या वर ओपन झाला,...
Read More
post-image
महाराष्ट्र

आता ठाण्यात पोलिसांच्या मदतीला रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स

ठाणे – ठाण्यात पोलिसांच्या मदतीला आता रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट आणि कळवा-मुंब्रा परिमंडळात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत...
Read More
post-image
महाराष्ट्र

आयटी इंजिनियरच्या आत्महत्येनंतर वाकडमधील सोसायट्यांनी अविवाहितांना घरे नाकारली

पुणे – पुण्याच्या आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या आणि वाकड येथे राहणाऱ्या बिहारच्या प्रसून कुमार झा या इंजिनियरने 28 एप्रिल रोजी तो राहत असलेल्या इमारतीच्या...
Read More