‘रिल’ लाईफमधल्या कलाकारांची ‘रिअल’ लाईफमधील ‘शोकांतिका’ – eNavakal
रविवार विशेष लेख

‘रिल’ लाईफमधल्या कलाकारांची ‘रिअल’ लाईफमधील ‘शोकांतिका’

प्रकाश गुजर –

 बॉलिवूड चित्रपटाची शेवट हा हॅपी एंडिगने होतो. मात्र त्यामधील कलाकारांच्या जीवनाचा शेवट हॅपी होईलच असे सांगता येत नाही. आपला लाडका कलाकार हा त्याच्या फिल्मी म्हणजेच ‘रील’ जिवनात कसा धीट, शूर  आणि खुश असतो हे पडद्यावर आपण नेहेमीच बघत आलोय. आपल्या वैयक्तिक म्हणजेच ‘रिअल’ जीवनातही हा कलाकार तसाच असेल असे नाही. फिल्मी कलाकारांच्या जीवनातही मोठ्या प्रमाणात चढ – उतार असतात. मानसिक त्राण आणि सुख, दुख असते. त्यामुळे अनेकदा त्यांचा शेवट आत्महत्या किंवा जीवघेण्या आजाराने आकस्मित  होतो. मागील काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेता इरफान खानला दुर्धर आजार झाल्याने  त्याच्या फॅन फॉलोईंगकडून सोशल मिडीयावर प्रार्थनांचा भडीमार होत आहे. आपल्याला दुर्धर आजार झाला असल्याचे इरफानने ट्विटरवर जाहीर केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याचे कळत आहे. म्हणून या जीवघेण्या आजाराबाबत आणि बॉलिवूडच्या चंदेरी दूनियेतील कलाकारांच्या ‘रिअल’ जीवनातील शोकांतिका ई-नवाकाळ आपल्यासाठी घेऊन आला आहे.

इरफानचा आजार :- 

दुर्मिळ भूमिकांचा शोध घेता घेता एक दुर्धर आजार जडला असल्याचा ट्विट इरफानकडून पोस्ट करण्यात आली होती. तसेच या दुर्धर आजाराबाबत काही दिवसातच सर्वांना माहिती देणार असल्याचेही त्याने ट्विटर पोस्टवर लिहिले होते. या ट्विटमुळे गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेचा इरफान खानला झालेल्या आजाराबद्दल चर्चांचे वादळ उठले होते. या चर्चांना अभिनेता इरफान खानने पूर्णविराम दिला आहे. ‘न्युरो इंडोक्राइन’ ट्युमर नावाचा आजार इरफानला झाला असून उपचारासाठी तो लवकरच लंडन येथे  जाणार आहे.

काय असतो ‘न्युरो इंडोक्राइन’ ट्युमर :-

न्युरो इंडोक्राइन ट्युमर म्हणजे मज्जासंस्था आणि हार्मोन्स यांच्या पेशींमधून गाठ तयार होते. या गाठी शक्यतो आतडे, अधिकतः फुफ्फुसे, स्वादुपिंड किंवा शरीरात कोणत्याही भागात होऊ शकते. ही गाठ किरकोळ स्वरुपाची असल्यास त्यावर उपचार शक्य आहे. वेळीच उपचार मिळाल्याने ही गाठ पुर्णपणे काढू शकतो. या गाठींमुळे अनेकदा रुग्णाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. पोटात दुखणे, रक्तदाबाचा त्रास आणि गाठीच्या जागेवर दुखणे ही या आजाराची लक्षणे आहेत. फेओट्रोमोसाइटोमा, मेर्केल सेल कॅन्सर,न्युरोएंडोक्राइन कार्सिनोमा आणि पॅरागंग्लिओमा हे या आजाराचे प्रकार आहे. शरिरात ज्या ठिकाणी हा आजार होतो. त्यानुसार या गाठी या प्रकारात मोडल्या जातात.

मृत्यूच्या दाढेतून परतलेले कलाकार आणि क्रिकेटर :-

बॉलिवूडमध्ये अनेक कलांकारांना त्यांच्या जीवनात जीवघेण्या आजाराने ग्रासले आहे. मात्र, योग्यवेळी उपचारामुळे ते मृत्यूच्या दारातून बाहेर पडलेल्या अनेक कलाकारांची माहिती पुढील प्रमाणे….

अमिताभ बच्चन- (आतड्यांचा आजार)

जुलै १९८२ साली बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांना कुली चित्रपटात पोटावर बसलेल्या बुक्क्यामुळे त्यांच्या आतड्यांना जबर ईजा झाली होती. या नंतर उपचारानंतरही त्यांच्या आतडे बरे झाले नाही आणि त्यांचे छोटे आतडे आणि मोठे आतडे हे कमजोर झाले आहेत. अद्यापही त्यांच्यावर रुग्णालयत उपचार सरु आहेत.

शाहरुख खान :- (८ सर्जरी)

बॉलिवूडचा किंग खान याच्या हाड, गुडघा, मान, डोळा आणि खांद्यावर सर्जरी झाली आहे. या सर्जरीनंतरही शाहरुख खान लोकांचे मनोरंजन अविरतपणेकरत आहे.

मनिषा कोयराला :- (गर्भाशयाचा कर्करोग)

२९ नोव्हेंबर २०१२ रोजी अभिनेत्री मनिषा कोयराला कॅन्सर झाल्याची बाब उघडकीस आली. या नंतर १० डिसेंबर २०१२ रोजी मनिषा उपचारासाठी परदेशात गेली. उपचारानंतर त्यांचा आजार बरा झाला. मागील काही वर्षांपासून मनिषाही कॅन्सरमुक्त जीवन जगत आहे.

 

युवराज सिंग :- (कर्करोगचा पहिली टप्पा)

२०११ साली वर्ल्डकपमध्ये खेळत असताना युवराज सिंगला रक्ताच्या उलट्या आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता. युनाटेड स्टेस्ट ऑफ अमेरिकेला जाऊन उपचार घेतल्यानंतर युवराजचा कर्करोग बरा झाला. मार्च २०१२ ला युवराज भारतात परतला आणि क्रिकेटमध्येही त्याने वापसी केली.

त्रृतिक रोशन :- (ब्रेन क्लॉट)

मोठ्या पडद्यावर सुपरहिरोची भूमिका करणारा अभिनेता त्रृतिक रोशनला ब्रेन क्लॉट झाला असल्याची माहिती त्याने क्रिश – ३ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी दिली. आता आपण पुर्णपणे बरे असल्याचा दावाही त्रृतिकने केला होता.

अनुराग बसु :- (रक्ताचा कर्करोग)

‘बर्फी’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बसु यांना २००४ साली रक्ताचा कर्करोग झाला होता. या आजारातून वाचण्याची फक्त ५० टक्के वाचण्याची शक्यता होती. मात्र उपचारानंतर त्याचा आजार बरा झाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. स्टीव्ह इरविन यांना ‘क्रोकोडाइल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेशात अटक

सहारनपूर – सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या संशयितांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

प्रियांका-फरहानच्या ‘स्काय इज पिंक’ची तारीख ठरली

मुंबई – अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तर यांचा आगामी चित्रपट ‘स्काय इज पिंक’ कधी प्रदर्शित होणार याविषयी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. पण आता...
Read More