रिलायन्सला जिओच्या फायबरकरिता मुंबईचे रस्ते खोदू द्या… – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

रिलायन्सला जिओच्या फायबरकरिता मुंबईचे रस्ते खोदू द्या…

मुंबई – यापूर्वी मराठी माणसांची असलेली मुंबई परप्रांतियांची बनली. इमारती, कारखाने, मॉल्स, हॉटेल, चित्रपटगृहे, कापड मिल्स आणि हिंदी चित्रपटसृष्टी सर्व काही अमराठी माणसांच्या मालकीचे झाले. आता मुंबई महापालिकेने बांधलेले 1700 किलोमीटरचे रस्तेही भारतातील सर्वात श्रीमंत असलेल्या उद्योगपती मुकेश अंबानींच्या ताब्यात गेले आहेत. मुकेश अंबानींच्या रिलायन्स-जिओ या कंपनीने मुंबईतील सर्व रस्ते 450 कोटी रुपये डिपॉझिट भरून जणू विकत घेतले आहेत. भाजपा सरकारचा आशीर्वाद असल्यामुळे आता रिलायन्सने या 450 कोटीतील 200 कोटी रुपये काढून घेतले आहेत. या मुंबईच्या रस्त्यांवर रिलायन्स-जिओ कुठेही व कधीही खोदकाम करून त्यांची फायबर टाकू शकते. 450 कोटी रुपये डिपॉझिट देऊन ही फायबर कोणत्याही रस्त्यावर टाकण्याच्या कामाची परवानगी रिलायन्सने मिळवली आहे.

जिओ मोबाईलसाठी रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मुंबईतील महापालिकेच्या 22 वॉर्डमध्ये कुलाबा ते दहिसर आणि सीएसएमटी ते मुलुंडच्या रस्त्यांवर रिलायन्स-जिओला तब्बल 10,000 किलोमीटर लांबीची केबल टाकायची आहे. त्यासाठी दरदिवशी एकाचवेळी अनेक रस्ते खोदले जातात. त्यामुळे तयार झालेले 3-3 फूट खोलीचे व 2-2 किलोमीटर लांबीचे खड्डे अनेक दिवस बुजविले जात नाहीत. काही ठिकाणी खड्डे बुजवतात तेही हवे तसेच बुजवतात. यामुळे चालण्यास अडथळा होतो.

डायरेक्ट मंत्रालयातून परवानगी
विशेष म्हणजे कोणताही रस्ता फायबरसाठी खोदताना पालिकेकडून अधिकृत परवानगी घेतली जात नाही. कुणातरी स्थानिकाला पकडून त्याच्यामार्फत रस्ता खोदणार असल्याचा फक्त अर्ज पालिकेत पाठवतात आणि परवानगीसाठी न थांबता खोदकाम सुरू करतात. असे कळते की, थेट मंत्रालयातून मुंबई महापालिका आयुक्तांना आदेश येतात. त्यामुळे आयुक्तांना परवानगी देण्याशिवाय पर्याय नसतो. आता आयुक्तांचा आदेश आल्यावर वॉर्ड ऑफिसर आणि विभागीय अभियंते निमूटपणे रस्त्यांवर होणार्‍या या खोदकामाकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्याकडे इतर पर्यायच नसतो.
फायबरसाठी रस्ते खोदून रस्त्यांची वाट लावल्यावर हे खड्डे बुजविण्याची जबाबदारीही रिलायन्स-जिओ कंपनीवर टाकलेली नाही. ते काम महापालिका करते. कंत्राटदारांकडून पालिका हे काम करून घेते. त्यासाठी महापालिका या खोदकाम करणार्‍या कंपन्यांना मजुरी देते. हे खाजगी कंत्राटदार थातुरमातुर पद्धतीने कसेतरी खोदलेले रस्ते बुजवून टाकतात.

दरवर्षी मुंबईतील रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडतात. ते बुजविण्यासाठी पालिका दरवर्षी 1000 कोटी रुपये खर्च करते. मग शेकडो किलोमीटरचे रस्ते खोदणार्‍या रिलायन्स-जिओ कंपनीकडून फक्त 450 कोटी रुपये डिपॉझिट घेते हा विरोधाभास आहे. कारण डिपॉझिट हे परत घेतले जाऊ शकते. रिलायन्स-जिओ कंपनीला भाजपाच्या केंद्रातील व राज्यातील सरकारचा आशीर्वाद असल्यामुळे आता त्यांनी महापालिकेला डिपॉझिट म्हणून दिलेल्या 450 कोटी रुपयांच्या डिपॉझिटपैकी 200 कोटी रुपये परत घेतले आहेत. रिलायन्स-जिओ कंपनी 250 कोटी रुपयांमध्ये मुंबई
खोदत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More