रिलायन्सच्या इन्फ्रा बोर्डावर अनिल अंबानींचे दोन्ही पुत्र – eNavakal
News आघाडीच्या बातम्या देश

रिलायन्सच्या इन्फ्रा बोर्डावर अनिल अंबानींचे दोन्ही पुत्र

नवी दिल्ली – एडीएजी अर्थात रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी दोन्ही पुत्र रिलायन्स बोर्डामध्ये सामिल झाले आहे. अंशुल अंबानी आणि अनमोल अंबानी अशी दोघा मुलांची नावे आहेत.
रिलायन्स इन्फ्रा ही कंपनी सध्या कर्जामध्ये तरंगत आहे. ही कंपनी 2020 पर्यंत कर्जमुक्त करण्याचा या अंबानी पुत्रांचा मानस आहे. कंपनीला सावरण्यासाठी अनिल अंबानी उद्योग समुहाची ही नवी पिढी पुढे सरसावली आहे. या दोघांनी कंपनीच्या संचालकपदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला. या दोघांसह निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. 24 वर्षीय अंशुल अंबानीने न्युयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न ऑफ बिझनेसमधून पदवी मिळवली आहे. तर 29 वर्षीय अनमोल अंबानीने ब्रिटनच्या वारविक बिझनेस स्कुलमधून मॅनेजमेंट अभ्यासक्रमात बीएससी पदवी मिळवली आहे.
हे दोघे भाऊ आधीपासून अंबानी समुहाच्या कंपन्यामध्ये काम पाहत आहे. मात्र प्रत्यक्ष संचालक मंडळावर दोघांची प्रथमच वर्णी लागली आहे. त्यामुळे रिलायन्स इन्फ्राच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांचा सहभाग असणार आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहावर एकूण 93,900 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यापैकी रिलायन्स इन्फ्राच्या 17 हजार 800 कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. तसेच रिलायन्स जवळ अ‍ॅन्ड इंजिनियरींग – 7000 कोटी, रिलायन्स कॅपिटल- 38,900 कोटी, रिलायन्स पॉवर – 30,200 कोटी रुपये इतके कर्ज आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More