रिया कधीही आदित्य ठाकरेंना भेटली नाही! वकिलांचा खुलासा – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन राजकीय

रिया कधीही आदित्य ठाकरेंना भेटली नाही! वकिलांचा खुलासा

नवी दिल्ली – अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या वकिलांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. रियाच्या वकिलांनी सांगितले की, रिया चक्रवर्ती कधीही आदित्य ठाकरे यांना भेटली नाही. एवढेच नव्हे तर आदित्य ठाकरे यांच्याशी रियाने कधीही टेलिफोनवरदेखील संभाषण केलेले नाही. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत, एवढेच रियाला माहित आहे. सुप्रीम कोर्टात अत्यंत निरर्थक युक्तिवाद आणि टीकाटिप्पणी केली जात आहे. या प्रकरणात सत्य जाणून घेण्यापेक्षा राजकारण अधिक होत आहे. अगदी निरर्थक गोष्टी सर्वोच्च न्यायालयात सादर केल्या जात आहेत.

रियाच्या वकिलांनी पुढे असेही म्हटले आहे की, बिहारमध्ये दोन महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सुशांत सिंह प्रकरणाचा लाभ उठविण्याचा अनेक बिहारी नेते प्रयत्न करीत आहेत. कायद्याप्रमाणे बिहार पोलिसांनी दाखल करून घेतलेला झिरो एफआयआर मुंबई पोलिसांना हस्तांतरित करायला पाहिजे. सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी बिहार पोलिसांचे कुठचेही अधिकारक्षेत्र नाही. रियाने सुशांत सिंह याच्याकडून पैसे घेतलेले नाहीत. रिया बेकायदेशीर चौकशीला कधीही हजर राहणार नाही.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी गोवण्यात आल्यावर आदित्य ठाकरे यांनी स्वतःच स्पष्टपणे सांगितले होते की, ‘सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मला व माझ्या परिवाराला टार्गेट केले जात आहे. या प्रकरणाशी माझे काहीही घेणेदेणे नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मी नातू असून महाराष्ट्र आणि ठाकरे परिवाराची प्रतिमा मलिन होईल’, असे कुठचेही काम मी करणार नाही. सुशांत सिंह प्रकरणात अत्यंत घाणेरडे राजकारण केले जात आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश शिक्षण

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवरील युक्तिवाद आणखी ३ दिवस चालणार

नवी दिल्ली – देशभरातील विद्यापीठांच्या पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सर्वच राज्यांकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी ‘ड्रीम ११’ कंपनी २२२ कोटी मोजणार

नवी दिल्ली – यंदा यूएईमध्ये होणाऱ्या बहुप्रतीक्षित आयपीएलला नवा प्रायोजक मिळाला असून ‘ड्रीम ११’ आता आयपीएलची मुख्य प्रायोजक कंपनी असणार आहे. त्यासाठी ‘ड्रीम ११’...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन राजकीय

रिया कधीही आदित्य ठाकरेंना भेटली नाही! वकिलांचा खुलासा

नवी दिल्ली – अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या वकिलांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. रियाच्या वकिलांनी सांगितले की, रिया चक्रवर्ती कधीही...
Read More
post-image
महाराष्ट्र

मनसे कार्यकर्त्यांनी अदानी इलेक्ट्रिसिटी फलकावर लिहिले अदानी चोर है! घोषणा दिल्या ‘सरकार चोर है’!

मुंबई – पश्चिम उपनगरातील लाखो वीज ग्राहकांना दहा-दहा पट वीज बिले देणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीला यापूर्वी निवेदन देऊनही ग्राहकांना भरमसाठ वीज बिले येतच आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

वेदगंगेला महापूर; ५ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर – पाटगाव धरणक्षेत्रात होत असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला महापूर आला आहे. निपाणी-राधानगरी मार्गावर निढोरी येथे वेदगंगा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने येथून...
Read More