रिफायनरीविरोधात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधत शिवसेनेचा मच्छीमारांसह लाँगमार्च – eNavakal
News महाराष्ट्र

रिफायनरीविरोधात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधत शिवसेनेचा मच्छीमारांसह लाँगमार्च

रत्नागिरी,- राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेने आक्रमक होत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च काढला. सरकारच्या निषेधासाठी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधत साळवी स्टॉप ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा लाँग मार्च काढण्यात आला. रिफायनरी विरोधी शेतकरी, स्थानिक प्रकल्पग्रस्त व मच्छीमार संघटनाही यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सध्या कोकणातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना या प्रकल्पाच्या विरोधात आहे. त्यातच सत्तेत असलेला भाजप या प्रकल्पाच्या बाजूने सुरुवातीपासून आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला मात्र विरोधकांनी कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. दरम्यान पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पासारखा संहारक आणि प्रदूषणकारी प्रकल्प केंद्र व राज्यशासन कोकणावर लादत असून त्याच्या निषेधार्थ शिवसेना, प्रकल्प विरोधी शेतकरी, मच्छीमार यांनी आज लाँग मार्च काढला. सकाळी साडेअकराच्या सुमारास साळवी स्टॉप येथून या लाँग मार्चला सुरुवात झाली. रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायकजी राऊत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रदीपजी बोरकर, शिवसेना उपनेते व रत्नागिरी विधानसभा आमदार उदय सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीरजी मोरे, जिल्हा समन्वयक शरदजी जाधव, सह संपर्क प्रमुख राजेंद्रजी महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, रत्नागिरी जिल्हा महिला संपर्क प्रमुख नीलमताई जुवाठकर, जिल्हा महिला आघाडी शिल्पा सुर्वे आदी या लाँग मार्चमध्ये सहभागी झाले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More