गुन्हे महाराष्ट्र

रिपब्लिकन पँथर आणि कबिर कला मंचच्या कार्यकर्त्यांवर, कार्यालयांवर धाडींमुळे संताप

पुणे – आज पहाटे पाच वाजताच पुणे पोलिसांच्या पथकाने रिपब्लिकन पँथर आणि कबिर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर आणि कार्यालयावर धाडी घातल्या. यामुळे खळबळ माजली आहे. रिपब्लिकन पँथरच्या मुंबईतील कार्यालयांवर आणि कबीर कला मंचच्या पुण्यातील कार्यालयांवर धाडी घालण्यात आल्या. या धाडींवेळी पोलीस तपास वॉरंट घेऊन आले होते. या धाडी एल्गार परिषदेचा परिणाम होत्/या. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात शनिवार वाड्यासमोर अत्यंत भव्य अशी ‘एल्गार परिषद’ झाली. या परिषदेची मुंबईची जबाबदारी रिपब्लिकन पँथरवर आणि पुण्यातील तयारी कबिर कला मंचवर होती.

ही एल्गार परिषद झाल्यानंतर 7 जानेवारी 2018 रोजी रिपब्लिकन पँथर आणि कबिर कला मंचच्या कार्यकर्त्यांवर प्रक्षोभक भाषणे केल्याचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर आज या धाडी घालण्यात आल्या. या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हा चोराला सोडून संन्याशाला पकडण्याचा प्रकार आहे. एकबोटेला अटक झाली, पण भिंडेना पकडलेले नाही. यावरून लक्ष हटविण्यासाठी या धाडी घातल्या गेल्या आहेत. एल्गार परिषदेच्या तयारीसाठी निवृत्त न्या.पी.बी. सावंत यांनी पहिली बैठक घेतली होती. पोलिसांची हिंमत असेल तर त्यांनी पी.बी.सावंत यांना अटक करून दाखवावी. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मात्र म्हटले की, या धाडींचा एल्गार परिषदेशी संबंध नाही. शहरातील वाढत्या नक्षली कारवायांवर सुरक्षा व्यवस्था लक्ष ठेवून होती. या कारवाईत गुंतल्याचा संशय असलेल्यांच्या विरोधात ही कारवाई केली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा

मुंबई पराभवाचा बदला घेणार का?

मुंबई – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या वानखेडे स्टेडियम वर होणार्‍या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबई संघ आपल्या मागील पराभवाचा बदला घेणार का? याबाबत मुंबईच्या...
Read More
post-image
क्रीडा

पंजाबने पुन्हा केली दिल्लीवर यशस्वी स्वारी

नवी दिल्ली- आर अश्विनच्या पंजाब संघाने आज येथे झालेल्या आयपीएल स्पर्धेतील परतीच्या लढतीत पुन्हा एकदा दिल्लीवर यशस्वी स्वारी केली. दिल्लीच्या घरच्या मैदानात झालेल्या या...
Read More
post-image
क्रीडा

ज्योत्स्नाचा निकोलवर सनसनाटी विजय

इल गुव्हाना – भारताची स्टार महिला स्क्वॉशपटू ज्योत्स्ना चिनप्पाने येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत जागतिक क्रमवारीत माजी अव्वल क्रमांकावर असलेल्या मलेशियाचा निकोल डेव्हिडचा सनसनाटी...
Read More
post-image
क्रीडा

रैनाने पुन्हा विराटला मागे टाकले

हैदराबाद – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सुरेश रैनाने पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकून सर्वाधिक धावांचा विक्रम आपला नावावर लावला. हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात...
Read More
post-image
News मुंबई

बेकायदा बांधकामांना मालमत्ता कर रक्कमेच्या दुप्पट दंड

मुंबई –  मुंबईतील अनधिकृत बांधकामांवरील दंड आकारणीबाबत राज्यातील सर्व महापालिकांमध्ये एक वाक्यता असावी. अल्प उत्पन्न गटातील घटकांना न्याय मिळावा, म्हणून शासनाने अध्यादेश जारी केला...
Read More