रितेश देशमुखच्या मुलाचे तैमूरला ‘फिटनेस चॅलेंज’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

रितेश देशमुखच्या मुलाचे तैमूरला ‘फिटनेस चॅलेंज’

मुंबई – केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सुरू केलेले #HumFitToIndiaFit चॅलेंज देशभरात चांगलेच हीट झाले. बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकीय नेते मंडळी सर्वांनीच या चॅलेंजला स्विकारत आपापला सहभाग नोंदवला. आता तेच चॅलेंज बॉलिवूड स्टारकिड्सनी स्विकारले आहे. बॉलिवूड कपल अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांचा मुलगा राहिलने #BaccheFitToIndiaFit या चॅलेंजची सुरूवात केली आहे.

बच्चे पार्टीच्या या फिटनेस चॅलेंजचे सोशल मिडियावर कौतुक केले जात आहे. जेनेलियाने तिच्या मुलाचा राहिलचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये राहिल अॅडव्हेन्चर्स अॅक्टिव्हिटी करताना दिसत आहे. राहिलचा भितींवर चढतानाचा हा व्हिडिओ आहे. जेनेलियाने हा व्हिडिओ पोस्ट करत राहिलने त्याच्या बाबांचे #FitnessChallenge स्विकारले असून पुढे बच्चा गॅंगला तो चॅलेंज करत असल्याचे लिहिले आहे.

सलमान खानचा भाचा आहिल, तैमूर अली खान, करण जौहरची मुलं यश-रूही, तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य या बच्चा गॅगला राहिलने #BaccheFitToDeshFit चॅलेंज दिले आहे. याआधी रितेश देशमुखने #FitnessChallenge स्विकारत क्लॅयबिंगचा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या दोन वर्षाच्या राहिलला चॅलेंजसाठी नॉमिनेट केले होते. त्याच चॅंलेंजला स्विकारत राहिलचा हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहुल गांधींचा माफीनामा सुप्रीम कोर्टाकडून मंजूर

नवी दिल्ली – ‘चौकीदार चोर है’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा माफीनामा मंजूर करण्यात आला आहे. तसेच राहुल गांधी यांनी भविष्यात कोणतीही टिप्पणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राफेलच्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराबाबत दाखल झालेल्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

सबरीमाला मंदिर प्रवेशाचा निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार

नवी दिल्ली – नवी दिल्ली – ऐतिहासिक सबरीमाला प्रकरणावरील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात ३ विरुद्ध २ च्या बहुमताने सात न्यायमूर्तींच्या संविधान पीठाकडे पाठविण्यात आली आहे....
Read More
post-image
विदेश

वेनिसला महापुराचा तडाखा; पर्यटकांचे हाल

वेनिस – जगातील सुंदर शहर अशी ओळख असलेल्या वेनिस शहराला महापुराने विळखा घातला आहे. इटलीतील या शहराचे महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील जनजीवन...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, राजकारण आमच्यासाठी धंदा नाही – संजय राऊत

मुंबई – ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात शब्दाला किंमत आहे. आमची वृत्ती व्यापारी नाही,...
Read More