रिक्षाचालक ऐन पावसाळ्यात संपावर जाणार – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र मुंबई

रिक्षाचालक ऐन पावसाळ्यात संपावर जाणार

मुंबई – ऑटोरिक्षा चालक आणि मालक रिक्षांची भाडेवाढ व अन्य मागण्यांसाठी येत्या ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यात संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षाचालक सहभागी होणार असल्याची माहिती द ऑटोरिक्षा युनियनचे प्रमुख शशांक राव यांनी दिली आहे. ऑटोरिक्षा क्षेत्रातील सर्व युनियन्सची संयुक्त बैठक काल रविवारी मुंबईत झाली. आपल्या मागण्यांवर चर्चा करून त्या जर पूर्ण न झाल्यास ९ जुलैपासून संपावर जाण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. परंतु ऐन पावसाळ्यात हा संप सुरू झाल्यास वेळापत्रक कोलमडल्याने सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, टॅक्सी-रिक्षांची किमान भाडेवाढ आणि प्रादेशिक स्वरूपाच्या परमीटला विरोध करण्यासाठी ठाणे-रायगड जिल्ह्यातील टॅक्सी व रिक्षा चालकांनी १८ जून रोजी एक दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघर, इत्यादी महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे. याबाबत कोकण विभाग ऑटो व टॅक्सी महासंघाची शनिवारी बैठक झाली असून त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More