रिक्षांना स्कूल बसचा परवाना कसा? हायकोर्टाचा सवाल – eNavakal
News मुंबई

रिक्षांना स्कूल बसचा परवाना कसा? हायकोर्टाचा सवाल

मुंबई – शालेय बसला कमीतकमी 13 आसनाचे बंधन असताना 3 आसनी रिक्षांना विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची परवानगी कशी दिली जाते, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.

तीन आसनी रिक्षांमध्ये आठ ते दहा विद्यार्थ्यांना बसविले कोंबले जाते. विद्यार्थी रिक्षांमध्ये लटकत असतात.त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे.त्यांचा जीव धोक्यात घातला जात आहे, असे स्पष्ट करून नियमात दुरुस्ती करा. अन्यथा आम्ही आदेश देतो, असे न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला बजावले.
राज्य सरकारने स्कूल बसबाबतच्या नियमांत बदल करून परिवहन विभागाने 19 मे रोजी एका आदेशाद्वारे रिक्षा आणि 12 पेक्षा कमी आसनी वाहनांनाही स्कूल बस म्हणून वापरण्यास परवाना दिल्याचे परिपत्रकाकडे अ‍ॅड. रमा सुब्रम्हण्यम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल घेऊन न्यायालयाने सरकारला आणि परिवहन विभागाच्या सह सचिवांना चांगलेच धारेवर धरले.
न्यायालयाने वारंवार शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बसबाबतच्या नियमाचे पालन करण्याचे आदेश आहेत, असे असताना रिक्षांना परवाना देण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून त्यात दुरुस्ती कशी काय केली जाते. स्कूल बसला 13 आसनांचे बंधन असताना त्यात नियमात दुरुस्ती करून 3 आसनी रिक्षांना परवानगी दिलीच कशी जाऊ शकते, असा सवाल केला. याबाबत सरकारी वकील अ‍ॅड. अभिनंदन वग्यांनी यांनी बाजू मांडताना ग्रामीण भागात स्कूल बसचा वापर करणे कठीण असल्याने काही पालक आपल्या मुलांना ने आण करण्यासाठी रिक्षांचा वापर करता. म्हणून रिक्षा परवाना देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाचे या उत्तराने समाधान झाले नाही. नियमात दुरुस्ती करा, असे राज्य सरकारला बजावत याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुलवामा हल्ल्याचा निषेध करत दादरमध्ये व्यापार्‍यांनी काढला मोर्चा

मुंबई – पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत दादरमधील व्यापार्‍यांनी मोर्चा काढून शहिद जवानांना आदरांजली वाहिली. या व्यापार्‍यांनी आज दुकाने बंद ठेऊन दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणा...
Read More
post-image
News देश

हिमाचल प्रदेशमध्ये हिमस्खलन एक जवान शहीद! 5 बेपत्ता

शिमला- हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात हिमस्खलन झाले असून लष्कराचे सहा जवान बर्फाच्या ढिगार्‍याखाली अडकले आहेत. यातील एका जवानाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून अद्याप...
Read More
post-image
News देश

तामिळनाडूत द्रमुक-काँग्रेसची युती

चेन्नई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम यांची आघाडी जाहीर झाली. दोन्ही पक्षात जागावाटप झाले आहे. काँग्रेस तामिळनाडूमध्ये 9,...
Read More
post-image
News मुंबई

फडणवीसांच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

मुंबई – शिवसेना- भाजपाच्या दिलजमाईनंतर आता दोन्ही पक्षांच्या आमदारांसाठी एकत्रित स्नेहभोजनाचा जंगी बेत आखण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी हे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

दहशतवाद संपविण्यात भाजप सरकार अपयशी! शरद पवारांची मोदींवर टीका

नांदेड – पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती योग्य नव्हती. दहशतवाद संपविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले, अशी घणाघाती टीका...
Read More