रिओपेक्षा टोकियो ऑलिम्पिक ‘खर्चिक’ – eNavakal
क्रीडा विदेश

रिओपेक्षा टोकियो ऑलिम्पिक ‘खर्चिक’

टोकियो – २०२० साली जपानमध्ये होणार्‍या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठीच्या तिकीटांचे दर स्पर्धा आयोजकांनी घोषित केले. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी तिकीटांचे दर १२ हजार येन (११० डॉलर्स) आणि ३ लाख येन (२६७० डॉलर्स) राहतील.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आयोजकांनी या स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारांसाठी तिकीटांचे दर जाहीर केले. ही तिकीटे २०२० येन (१८ डॉलर्स) ते २७६० येन असे ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेतील एकूण तिकीटांपैकी अर्ध्याहून अधिक तिकीटांचे दर ८००० येन (७१ डॉलर्स) पेक्षा कमी आहेत. टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राहणार्‍या क्रीडा शौकिनांसाठी तिकीटांचे दर १२००० येन (११० डॉलर्स) ते ३ लाख येन (२६७० डॉलर्स) असे ठेवण्यात आले आहेत. काही क्रीडा प्रकारांसाठी तिकीटांचे दर खास कमी करण्यात आले आहेत, असे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकच्या तुलनेत २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा अधिक खर्चाची ठरणार आहे. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकच्या तुलनेत २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक तिकीट दरामध्ये फारसा फरक नसल्याचे नमुद करण्यात आले. टोकियो ऑलिम्पिकमधील अ‍ॅथलेटीक्स हा क्रीडा प्रकार सर्वात खर्चिक राहणार आहे. या क्रीडा प्रकारासाठी तिकीटांचे दर ३००० येन (२६ डॉलर्स) ते १,३०,००० येन (११५६ डॉलर्स) ठेवण्यात आले आहेत. पुढील वर्षीच्या हिवाळी मोसमापासून २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक तिकीट विक्रीला प्रारंभ करण्यात येणार आहे. या स्पर्धेत ७.८ दशलक्ष तिकीटांची विक्री अपेक्षित असून त्यामधून स्पर्धा आयोजकांना ७७.३ अब्ज बिलियनची कमाई होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More
post-image
News मुंबई

सांताक्रुझमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर! पालिकेची डोळेझाक

मुंबई – राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरांवर बंदी लागू केल्यानंतरही सांताक्रुझ (पुर्व) भागातील फेरीवाले व काही दुकानदार प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करताना...
Read More
post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More