राहुल गांधीकडून दिल्लीत आम आदमी पक्षाला ४ जागांची ऑफर – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

राहुल गांधीकडून दिल्लीत आम आदमी पक्षाला ४ जागांची ऑफर

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीत कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी दरम्यान गठबंधन होणार की नाही हे एक कोडे बनले आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आघाडी करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना खुली ऑफर दिली आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला ४ जागांची ऑफर राहुल गांधी यांनी दिली. त्यांनी टि्विटच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना ही ऑफर दिली. मात्र यावर अरविंद केजरीवाल यांनी राहुलवर जागा देण्याचा दिखावा करण्याचा आरोप केला आहे. 

लोकसभा निवडणुकांसाठी दिल्लीमध्ये आघाडी करण्यासाठी राहुल गांधी यांनी आम आदमी पक्षाला दिल्लीतील ७ जागांपैकी ४ जागा देऊ, आशी ऑफर दिली आहे. त्यांनी टि्टरच्या माध्यामातून अरविंद केजरीवाल यांना ही ऑफर दिली. ‘जर दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस एकत्र आले तर भाजपचा मोठा पराभव होईल, आम्ही आघाडीसाठी एक पाऊल उचलले आहे. आता तुमची वेळ आहे’, असे राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले.

यावर ‘आघाडी करण्याची ऑफर ही तुमची इच्छा नसून फक्त दिखावा आहे. मोदी-अमित जोडी पासून देेशाला वाचवायचे आहे. मात्र दुर्देव आहे की तुम्ही मोदीच्या विरोधातल्या मताचे विभाजन करत आहात’, असे अरविंद केजरीवाल यांनी टि्वट करून म्हटले आहे.

 लोकसभा निवडणुकांसाठी दिल्लीमध्ये सहाव्या टप्प्यात 12 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 16 एप्रिलपासून अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरू होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 23 एप्रिल आहे.

 

 

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) एका छोट्या मुलीने जगभरात वादळ निर्माण केलंय आपण कधी जागृत होणारच नाही का?

मुंबईत बसणार्‍याला खूप उकडतंय, पुण्यात तर चटके असह्य होतायत, विदर्भ मराठवाड्यात सतत दुष्काळ पडतोय, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात चैत्रात पाऊस पडतोय, गारांचा मारा होतोय,...
Read More